Letters

पत्र.क्र. ७१

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*चि. दत्ताबुवा यांस आर्शीवाद*

चि. xx चे पत्र येऊन पोहोचले. जिथला जिथला अन्नोदक ऋणानुबंध ज्या ज्या वेळेला असतो त्या त्या वेळेला तिथे तिथे जावयाला लागते. तिकडचा योग आला म्हणजे आपोआप ओढल्यासारखा तिकडे जाईन.

इथुन द्वारकेला जाईन, समुद्र हवेने बरे वाटेल. सर्वानीहि प्रेमाने राहून उपासना, ज्ञानाभ्यासादि साधन निरलसपणे करीत जावें.

*’प्रमादो ब्रह्मनिष्ठाया न कर्तव्यः कदाचन।*
*प्रमादो मृत्यरित्याहुर्विद्याया ब्रह्मवादिनः ॥*
*यशांपकृष्ट शैवाल क्षणमात्रं न तिष्ठति।*
*आवृणोति तथा माया प्राज्ञं वापि पराङ्मुखम् ।।’*

हे लक्षात ठेवून एक क्षणभरहि पराङ्मुख अथवा बहिर्मुख राहूं नये.
स्वप्रकाशक असूनहि ज्यात वेगळे म्हणून काही कधीच उत्पन्न होत नाही. ज्यांत वेगळे म्हणून काही नाही अशा नित्य निर्विकल्प ज्ञानमात्र स्वरूपाचा निश्चय आपल्या मीपणाच्या भानांत सर्व कल्पनेत अखंड तेवत ठेवा, यालाच निजिध्यास म्हणतात. *निजिध्यासें साक्षात्कार नेमस्त आहे.*

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’*

*श्रीधर*

*भाद्रपद पौणिमेपर्यंत इथे मुक्काम आहे कोण्या एकाच्या नावावर लिहिलेल्या पत्रांत जो आशीर्वाद आणि उपदेश असतो तो सर्वानाच असतो.*

home-last-sec-img