*© श्रीधर संदेश*
*श्रींचा आशीर्वाद*
*॥ श्रीराम समर्थ ॥*
*अखिल भक्त मंडळीस अनेक शुभाशीर्वाद -*
*’तुष्टेन भगवता ज्योतिर्मयेनात्मैव दत्तो यस्मात् तस्मात उच्यते दत्त इति ।’*
आज दत्तजयन्तीचा मंगलमय सुखोदय आहे, अशा शुभसमयीं शिव-तारक-मन्त्राचे अनुष्ठान संपूर्ण झाले आहे. स्वतः श्रीविश्वनाथ आपल्या भक्तियुक्त, पवित्रपावन अनुष्ठानामुळे अत्यंत सन्तुष्ट होऊन अतिप्रसन्नतेने वरदान देण्यास उद्युक्त झाले असून प्रार्थनेची प्रतीक्षा करीत उभे आहेत.
*यस्मादुच्चार्यमाण एव गर्भजन्मव्याधिजरामरणसंसारमहाभयात् तारयति त्रायते च तस्मादुच्यते तारम् ।’*
केवळ उपचार केल्याने गर्भ, जन्म, व्याधि, जरा, मरण आणि संसारिक महाभय ह्यांपासून आपणास मुक्त करतो तोच तारक मन्त्र होय. ह्या मन्त्राच्या अर्थाप्रमाणेच आपले अनुष्ठान सफल होवो, आपण सर्व ह्या महाभाग्यामुळे कृतार्थ होऊन दिव्य जीवन व्यतीत करा.
*सर्वे जना: सुखिनो भवन्तु :’*
*आपणा सर्वाचा मंगलमय आनंदरूप आत्मा*
*श्रीधरस्वामी*