Letters

पत्र.क्र. ८३

*© श्रीधर संदेश*

*पूर्वपीठिका-* श्रींची स्वारी शिगेहळ्ळी मठांत असतांना सत्संगाकरिता बरीच मंडळी काही मठांत तर काही मठांबाहेर रहात असत. सकाळी भाष्य ग्रंथावर, दुपारी आत्मपुराणावर व सायंकाळी श्रीमत् शंकराचार्यांच्या प्रकरण ग्रंथावर अशी स्वामीजींची रोज तीन वेळा प्रवचने होत. मधून कोणी काही प्रश्न विचारल्यास स्वामीजी त्याचे समाधान करीत. श्रवणात येणा-या मंडळीत कप्पे आडनावाचे एक कुटुंब होते. त्या कुटुंबांत आई, मुलगा व मुलगी अशी तीन माणसे होती. मुलगा बऱ्याच वर्षांपासून मठांत होता, आई व मुलगी दोघी मात्र स्वामीजी तेथे आल्यापासून मठांत राहण्यास आल्या. आईने मुलांना परमार्थाचे बाळकडूच पाजले होते. त्या मुलीचे नाव नेत्रा. ती त्यावेळी फारतर १२ वर्षांची होती. ती मठांतील संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिकून अखंड श्रवणमननांत असे. तिचे ज्ञान, काव्यशक्ति व वैराग्य पाहून स्वामीजींना तिचे कौतुक वाटे. तिने कानडी, मराठी व संस्कृत या तीन भाषातून काव्यरचना केली असुन तिच्या ज्ञाननिष्ठेस प्रोत्साहन देण्यासाठींच श्रींनी हे पत्र लिहिले आहे.

*ज्ञान नेत्रं समादाय शोभते या महीतले।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ॥१॥*
ज्ञाननेत्रा मुळे पृथ्वीवर जी शोभून दिसो ती नेत्रा ब्रम्हरुप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*अकार्य निर्गुणं ब्रह्म याऽहंस्फूतों समीक्षते।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ॥२।।* जी अहंकाराच्या स्फूर्तीमध्ये अमूर्त निर्गुण पहाते ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*या जन्मकर्मभिः क्वापि सज्जते न कदाचन ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ।।३।।*
जिला जन्मकर्माचा दोष केव्हाही व कोठिहि लागत नाही ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*किंचिज्ज्ञेयं न यस्यां तज्ज्ञातुं भिन्न निजात्मनः ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ॥४॥* आपल्या आत्म्यशिवाय निराळे असे जाणण्यासारखें जिला काही नाही ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*चिन्मात्र वपुषा या च स्वात्मबोधत्स्वयंप्रभा ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रम्हरुपिणः ।।५।।*
जी चिन्मात्र स्वरूप असुन जिला आत्मज्ञान आहे व जी स्वयंप्रकाशित आहे. ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*विगताज्ञानमाया या ब्रह्मात्मैक्य निबोधनात् ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ।।६।।* अम्हात्मैक्याच्या ज्ञानाने जिची अविद्या व माया नाहीशी झाली आहे ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*ब्रह्मरूपा शिवाशान्त नित्यं या भाष्यते बुधैः।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ॥७॥*
विद्वान नेहमी जिला ब्रम्हरूप, कल्याणकारी व शांत मानितात ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*जीवेशौ बंधमोक्षौ च स्वरूपे या न पश्यति ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ॥८॥*
जी आत्मरूपांत जीवात्मा-परमात्मा, बंध-मोक्ष, हे द्वैत पहात नाही ती नेत्रा ब्रम्हरुप श्रीधरापेक्षां कधी हि भिन्न नाही.

*सचित्सुखघने नित्यं भिन्नं नैव यतस्ततः ।*
*नेत्रा सा न क्वचिद्भिन्ना श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ।।९।।* जी नित्य सच्चिदानंद रूपांत असून कोणत्याहि प्रकारे त्याहुन भिन्न नाहीं ती नेत्रा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा कधीहि भिन्न नाही.

*सच्चिदानंद रूपोऽहं न चाहं ब्रह्मणः पृथक् ।*
*ज्ञात्वाऽन्येऽपि न भिन्नाः स्युः श्रीधराद् ब्रह्मरूपिणः ।।१०।।* मी सच्चिदानंद रूप माहे. मी ब्रम्हापेक्षां निराळा नाही हे जाणल्याने इतर लोक सुद्धा ब्रम्हरूप श्रीधरापेक्षा भिन्न राहणार नाहीत.

*नार्यावापि नरस्यापि देहो भवतु तेन किम् ।*
*यस्यात्ममतिरुद्भता स जीवो ब्रह्मकेवलम् ।।११।।*
ते स्त्रीचें शरीर असो वा पुरुष शरीर असो त्याचे वैशिष्ठच काय? ज्याला आत्मज्ञान उत्पन्न झाले आहे तो जीव केवळ ब्रम्हच आहे..

*नित्यानंदघनेस्फारे मायादीनामसत्वतः ।*
*त्यक्त्वाऽध्यस्तं सदैकोऽस्ति जीवोय आत्मविद् भुवि ॥१२।।* अत्यंत नित्यानंद स्वरूपात मायादिकांना अस्तित्व नाही म्हणून जो जीव भ्रांति टाकून ब्रम्ह जाणतो तो एकमेवाद्वितीय होतो.

*रचनास्थळ-काँफिउद्यान मंगलूर*
*रचना काल-श्रावण शके १८६५.*

home-last-sec-img