*© श्रीधर संदेश*
*।।श्रीराम।।*
*वरदहळ्ळी*
*चि. दत्ता यांस आशिर्वाद*
या चातुर्मासात दुसरा कोणी असता तरी अगदी निजून असतां आधीच शरीर जर्जर होऊन गेले आहे. त्यांत या दुष्ट देवता शरीर खिळखिळे करून टाकतात. पुरे पुरे झाले आहे. आज नाही उद्या अनकुल दिवस येतील आणि कांही जगाचे कार्य होईल म्हणूनच केवळ आपत्तींना तोंड देऊन आत्मनिष्ठेच्या जोरावर शरीर धारण करून आहे. इतरांचे शरीर असते तर त्याचा या दुष्ट देवतांनी पार धुव्वा उडवून टाकला असता. माझ्या तपः सामर्थ्यालाहि जगात हा काय करील? कोण जाणे ? म्हणून श्रीरामादी सर्व महादेवांनी साखळदंडांनी ओढून धरले आहे. यांचे साह्य तर नाहीच उलट प्रतिबंधक. आणि सर्व जगातल्या मुसलमानांनी ख्रिश्चन आदी धर्माच्या दुष्ट देवतापासून डाव धरून बसले आहेत. कली दांत खातो, कामादिकांना मी शत्रु वाटतो तेहि आपल्याकडून होईल तितका प्रयत्न करतात, तशाच दुष्ट, देवतांना बरोबर घेऊन
रात्रंदिवस, कुठे याला रसातळाला पाठविता येईल म्हणून डोळयात तेल घालून बसले आहेत. या सर्वांना तुटक्या, फाटक्या, मोडक्या सामुग्रीनिशी मी एकला तोंड देत आहे. जगाची संकटे घालवीत, देवाची कला वाढवित, तिर्थक्षेत्र- देवस्थानादिकातलींही ब्रम्हराक्षसादिकांची बाधा घालवित त्यांना शुद्ध करीत एका आत्मनिष्ठेच्या बळावर टकरा घेतो आहे. सर्व देव आपापली कार्य करून घेतात पण मला एखादी दुष्टशक्ति येणार म्हणून सूचना सुद्धा देत नाहीत. हं असो !!
मी करतो ते सर्वांच्या हिताचे आहे ना? म्हणून न कंटाळता दक्षतेने सर्व करतो मी सर्वांचे शुद्ध परिपूर्ण रुप आहे. याचाच मला काय तनावा आहे.
श्रीनरसोबावाडीस इकडच्या पैकी कितीजण जाऊन राहिले आहेत, काही कळले नाही. असो ! पळपुटया गुरूंचे चेले झाल्यामुळे त्यांना असे कष्ट सोसावे लागले. परमात्माकृपेने त्यांच्या गुरूंची ही स्थिति लौकरच जाऊ ‘लोकोद्धार’ ही पदवी चिरंतर अशी सार्थ ठरो. देव त्या पोरक्या शिष्यांना सुखरुप ठेवो.
*श्रीधर*