Letters

पत्र.क्र. ९०

*© श्रीधर संदेश*

*श्रीसमर्थ सेवा मंडळास पत्र*

पृथ्वी फोडूनच बी अंकुरते. प्रसववेदनांच्या अंतींच पुत्रमुख दृष्टीस पडते, *’जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।’ ‘जेंही अनेक दुःख भोगिले । ते भाग्य भोगून राहिले ।।’* टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नाही. आढीतलाच आंबा उत्तम पिकतो. *ज्याला उत्कृष्ट कार्यक्षम बनवावयाचे आहे त्याच्यावरच देव अनेक संकटे आणतो. अनेक दु:ख-संकटातून बाहेर पडलेलाच उत्तम कार्यक्षम आणि तेजस्वी पुरुष होतो. निसर्गच असा ! ! त्यासाठी देवाला दोष देणे किंवा निष्ठूर मानणे म्हणजे आपणहून आपले हित घालवणे होय जितक्या कठीण परीक्षेतून उत्तीर्ण होईल तितकाच तो योग्य ठरेल.*

*भगवान श्रीधरस्वामी*

home-last-sec-img