*© श्रीधर संदेश*
*।।श्रीराम ॥*
*मंगळूर, १२-१-४६*
*चि. xxxx यांस आशीर्वाद*
कालच पत्र पाठविले आहे. कालच्या पत्रांतून चि. अय्यरचे पत्र मन निवळण्याकरिता पाठवून दिले आहे लोकांच्या मनांतूनहि झालेला गैरसमज त्याने दूर होईल असे वाटते.
*”देशकाल वर्तमान । सावधान सावधान । प्रसंग पाहुन करणे । सर्वकाहीं॥”*
आज नाही उद्या सत्य हे बाहेर पडतेच. सत्याचा संबंध परंपरागत ब्रह्माकडेच लागत असल्यामुळे त्याच्या सारखेच ते. पहिल्या प्रथम या जगांत सत्याविषयीहि विपरीत भावनाच जास्त. ढगांतुन सूर्य आपल्या नित्य निरावरण स्वभावाने जसा निसंग व निष्कलंक म्हणून आपली निजस्थिती प्रगट करीत बाहेर पडतो त्याप्रमाणेंच सत्याचेंहि होते. मन खट्टू करण्याचे काही कारण नाही. अनिष्ट परिणामाचे परिवर्तनहि तितक्याच जोमाने होते यांत संशय नाही.
*श्रीधर*