Letters

पत्र.क्र. १४

*© श्रीधर संदेश*

*(संग्राहक:- नीळकंठ रामदासी. सामनगड)*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*चि. कन्हैयालाल ( सोनगाव ) यांस अनेक आशीर्वाद.*

चि. दिनकरच्या पत्रांत तुला इकडून पत्र न आल्यामुळे कळकळ लागल्याचे लिहिले आहे. तुझ्या पत्रात उत्तराची अपेक्षा नसल्यामुळे पाठविले नाही.
*तेषामहं समुद्धर्ता* *मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरस्पार्थ मय्यावेषित चेतसाम् ।।* *’धारणागतासी देव* *झाला वज्रपंजरू ।’ ‘नुपेक्षी कदा रामदासाभिमानी । न मे भक्तः प्रणश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति।’* इतका हा निकटचा संबंध असताना मनांत का शंका बाळगावी ? *’ जेथे जेथें जाई* *भक्त । पाठी जाई हनुमंत । ‘न हि कल्याणकृत् कश्चिदुर्गति तमगच्छति ।* परमात्मा सर्वज्ञ आहे. *’माझे साहे परी माझ्या भक्तांचे न साहे।’* म्हणून कंठरवाने उद्घघोषित करणारा परमात्मा भक्तांचे कधी अनहित करील काय? क्षणोक्षणी आपल्या भक्तांचे पाऊल पुढे पुढेच उन्नति मार्गाकडे पडत असलेले पाहून भगवान संतुष्ट होतात. तो कोठे दूर नसून अतिजवळ म्हणजे जिथून सर्वांचे आपले म्हणून म्हटले जाणारे मी पणाचे भान उदय पावतें तें *तुम्हास पाठविली हाक । तेणे निरसला धाक ।* ‘ या अशा निर्भयस्थितीतच आस. भक्तांच्या उद्धारापलीकडे पूर्ण काम श्रीसर्वसमर्थ रामाला दुसरे कोणते कार्य आहे ?

*शुभं भूयात् ।*

*श्रीधर*

home-last-sec-img