Letters

पत्र.क्र. १५

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ॥*

*वरद्हळळी*
*आश्विन व. ४ थीं.*

*चि. पृथ्वीराज यांस आशीर्वाद,*

*सुवर्णाचे लोहो काहीं ।*
*सर्वथा होणार नाही ।*
*तैसा गुरुवास संदेहीं ।*
*पडोंचि नेणे सर्वथा ॥*
*का सरिता गंगेसी मिळाली ।* *मिळणी होता गंगा झाली ।*
*मग जरी वेगळी केली ।*
*तरी होणार नाही सर्वथा।।*

बाळ ! तुझ्याकडून आलेले पत्र चि. दत्ताने वाचून दाखविले. ऐकताना अंत:करण पिळवटून आले चातुर्मास्यांत कोणाचेही पत्र माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत, चातुर्मास्यांत स्वामीजींना विश्रांति द्यावी हाच यांत भक्तवृन्दाचा हेतु असतो. तुझी दोन पत्रे येऊन पोहोचली. अगदी प्रथमचे एक आणि दुसरे कालच येऊन पोहोचलेले. श्रीगुरु जीवमात्रांच्या उद्धारार्थच असतात. अमृतात जसा विषाचा कोणचाहि अंश नसतो त्याप्रमाणे श्रीगुरुस्वरूपांत अपायकारक कोणचे नसते.

*’ब्रह्मानदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।*

हे श्रीगुरुचे ध्यान याची साक्ष पटवून देईल. माझा तुझ्यावर कोप झालेला नाही आणि होणारहि पण नाही.

*’ उभा कल्पवृक्षातळी दु:ख बाहे। जया अंतरी सर्वदा तेचि राहे ‘* असे मात्र होऊ देऊ नये, काळजी करू नको. माझी पूर्ण कृपा आहे. भस्म पाठविलें आहे. रोज थोडे-थोडे ताईताच्या तीर्थातून अथवा ‘नमः शांताय ‘ या मंत्राने अभिमंत्रित केलेल्या तीर्थातून घेत जा. आणि हाच मंत्र अधिक कर *’सर्व देवात्मको गुरु : ‘ ‘ सर्व दु.खावधि गुरु: ‘* सर्व दुःख जाईल, सर्व सुख लाभेल. निःशंक ऐस.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img