Letters

पत्र.क्र. १६

*© श्रीधर संदेश*

*श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गरु भगवान श्रीधरस्वामीमहाराजांचा चातुर्मासांतील दिव्य संदेश*

तूं चाल पुढे चिद्रवि तूं बिचकुं नको रे।
हे वृत्तिमय तरंग दृश्य मृगजल सारे ॥
चिदुदधि तूं तुजमाजीं घोष होतसे ।
चिदहं मग त्यामधिं हे दृश्य दिसतसे ॥
आनंदचंद्र तूंचि सखा तव प्रकाश हा ।
विश्व म्हणूनि, जीव म्हणुनि, भासतो पहा ।
फुलीं फळीं विश्ववृक्ष गोड जो दिसे।
चिद्रुपें त्वत्सत्ता हेतु या असे ॥ सच्चिन्मय विश्वदेहिं तूंचि एकला । सच्चिद्घन विश्वात्मा शोभसी भला।।

*श्रीधरस्वामी*
*चातुर्मास शके १८८१*

home-last-sec-img