Letters

पत्र.क्र. २३

*© श्रीधर संदेश*

*सज्जनगड.*

*श्रींनी जानकीस पाठविलेले एक पत्र*

संसारसुखाचा त्याग करुन श्रीगुरुदेवांना अनन्य शरणागत होऊन, देहावरील प्रेम, देहाभिमान यांचा पूर्ण त्याग करून ज्ञान वैराग्य सम्पन्न होऊन गुरुकृपेने आनंदघन ब्रह्मरूप मी आहे असे समजून सर्व सद्गुण आत्मसात करुन आपल्या आचार विचारांनी सर्वांना आपलेसे करून परमप्रिय होऊन शांतिदांति यांनी शोभायमान होऊन, नित्य निर्विकार असलेल्या आपल्या दर्शनानेच मात्र कोणासही आपल्याबद्दल पूज्यभावना उत्पन्न करून आपल्या सान्निध्याने आतंसारखे दुसऱ्यामध्ये ज्ञान, वैराग्य, श्रद्धा, भक्ती, धर्म बुद्धी उत्पन्न करणाऱ्या *चिरंजीव जानकीस -*

नित्य ब्रह्मरूप होऊन तू जीवन कंठावे असा माझा परिपूर्ण आशीर्वाद आहे. चि. जानकीस दिलेले हे आशीर्वाद तिच्या एकटचापुरतेच नसून माझ्या सर्व शिष्य व शिष्यणी यांनाही असेच असावे, अशी माझी इच्छा मी प्रकट करीत आहे. जानकी ! हे तूं प्रत्येक दिवशी वाचीत जावे आणि असेच राहुन *”श्रीसद्गुरुंची प्रतिरोज प्रार्थना करावी. तुझ्या समवेत सर्वांनीहि असे व्हावे.”* असा मी माझ्या अंत:करणापासून दिलेला कृपापूर्ण आशीर्वाद आहे.

*इति शिवम्*

*तुमचे परमशुद्ध असलेले आनंदघनरुप*

*श्रीधर स्वामी*

home-last-sec-img