Letters

पत्र.क्र. ३७

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*भारतीय निवडणुकीच्या संदर्भात श्रीमत् भगवान श्रीधरस्वामी महाराजांनी दिलेला एक संदेश*

*’सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात् ।।’*

*लोकसत्ताक राज्यपध्दतीत ‘सर्वांगिक उन्नति’ हाच मुख्य उद्देश असतो. न्याय-विधायक सभेत प्रजेच्या सामाजिक, नैतिक, बौध्दिक व अध्यात्मिक अशा सर्व उन्नतीना प्राधान्य दिले जाते. प्रजेच्या उन्नत जीवनासाठी ही गोष्ट अत्यावश्यक आहे यांत संदेह नाही. या सर्व गोष्टीमुळे शक्तिमान झालेली प्रजा मानवांत श्रेष्ठ अशीच गणली जाते. कायद्याद्वारेच सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी अनुरूप व योग्य आचार-विचार घडविले जातात. न्यायविधायक सभेत ही सर्व तत्त्वे जाणणा-या व्यवहारचतुर अशा लोकांचीच आवश्यकता असते. ‘त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः । ही सर्व लक्षणे न्यायविधायक सभेत जाणाऱ्या सदस्यांत असणे अत्यावश्यक आहे, सदस्यांची निवड करण्याच्या वेळी प्रजेने आपल्या विभिन्न प्रकारच्या हिताच्या दृष्टीनेच या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे, अशी माझी कळकळीची सूचना आहे.*

जनतेने या सर्व गोष्टींचा संपूर्णपणे विचार करून येत्या निवडणुकीत योग्य मनुष्यास यशस्वी करावे अशी इच्छा मी प्रदर्शित करतो.

*इति शिवम् ।*
*सर्वजनहिताभिलाषी*

*- श्रीधरस्वामी*

home-last-sec-img