Letters

पत्र.क्र. ३८

*© श्रीधर संदेश*

*।।श्रीराम समर्थ ॥*

*चि. . . . . यांस आशिर्वाद*

बाळ, आनंदरूपाचा ओतीव पुतळा म्हणून श्रीराम, सीता, अंजनेय ह्यांचे ध्यान खरे शुद्ध रूपच म्हणून दृष्टी समोर आणून त्याकडे बघत बघत मानसपूजा करून त्यांच्या कृपापूर्ण असलेल्या हसत मुखाने स्वरूपानंदाचे ध्यान करीत करीत नादामध्ये जपाची अक्षरें स्मरत माळेचे मणी मोजले तर एकाच वेळी अनुसंधान, मूर्तिध्यान, नादानुसं धान व जप हे सर्व सिद्ध होईल. हे सर्व साध्य न झाल्यास तुला ते जसे साधेल तसे वरील एक, ध्यान करीत जावें. तें नच जमले तर असे कर.

सकाळच्या वेळी श्रीराम मंदिरात श्रीरामासमोर ध्यान करीत होईल तितका जप कर. त्यानंतर तुला ज्यामुळे समाधान वाटेल तसें कर.

*’कोणतेहि ध्यान आपल्या स्वरूपास सोडून नाही.’ ध्यान करा वयाचे ते सर्व आपले स्वरूप, जप करावयाचा तेच ‘अहं ब्रह्मास्मि’ अथवा ‘सोह’ याचें अनुसंधान, नाद म्हणजे अहं ब्रह्मास्मि म्हणण्याचे केवळ ध्वनीरूप. हे तत्त्वज्ञान सिद्धांताद्वारें जाणून अनुकूल होईल असें कर !*

*’अवघा आपण एक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।’*

*- श्रीधर स्वामी*

(वरील पत्र कोणाला पाठवले ते नांव मूळ श्रीधर संदेश पुस्तकात उपलब्ध नाही.)

home-last-sec-img