Letters

पत्र.क्र. ३

*© श्रीधर संदेश*

*(श्री नरसिंह ब्रह्मचारी यांना पाठविलेले एक पत्र)*

*परिवर्तिनिसंसारे मृतः को वा न जायते ॥*
*स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम् ॥१॥*

गरगर फिरणाचा (म्हणजे जन्ममृत्यूचे फेरे असलेल्या) या संसारात कोणता मृत पुन: जन्मत नाही? (म्हणजे जन्मास येणे यांत विशेष असे काही नाही.) ज्याच्या जन्मामूळे कुलास उन्नति प्राप्त होते तोच खरा जन्मास आला आहे. ।।१।।

*महता पुण्य पण्येन क्रीतेयं कायनौः खलु ॥*
*सत्संगाद्योहि मुक्तः स्यात्स धन्यो भुवि भाग्यवान् ॥२॥*

(जन्ममरणरूपी भवसागर तरून जाण्यासाठी) पुण्यरूपी मोठी किंमत देऊन ही शरीररूपी नौका विकत घेतली आहे. जो सत्संगतीमुळे यांतून मुक्त झाला तो या जगांत (खरोखर) भाग्यवान व धन्य होय. ॥२॥

*न तपस्तपइत्याहुब्रह्मचर्यं तपः परम् ॥*
*ऊध्वरेतस्विनो धन्याः प्राप्यतत्परमपदम् ॥३॥*

तपाला तप म्हणत नाहीत. ब्रह्मचर्य हेच महान तप होय , ब्रह्मचर्य पालन करणारे धन्य होत. तेंच परमस्थान (पद) प्राप्त करून घेतले पाहिजे. ॥३॥

*कोऽहं कथमिदं जातं कोवा कर्तास्य विद्यते ।।*
*इत्यालोच्य मुहुविद्वान् यो धन्यः स गुरुः स्मृतः ॥४॥*

मी कोण? हे (जग) कसे उत्पन्न झालें। अथवा त्याचा कर्ता कोण आहे? याचा वारंवार विचार केल्यामूळे जो विद्वान झाला आहे (म्हणजे जो हे जाणतो) तोच धन्य व गुरु होय. ।।४॥

*भ्रममूलमिदं विश्वं स्वात्मन्पारोपित वृथा ।।*
*अद्वितीये परे तरचे विश्वस्यावसरः कुतः ।।५।।*

हे विश्व भ्रममूल असून त्याचा आत्म्याच्या ठिकाणी वृक्षारोप केला जातो. (कारण) परब्रहा एकमेवाद्वितीय असल्याने तेथे विश्वाला जागा कोठे आहे? ।।५।।

*यया वृत्यामनः सम्मक् परेब्रह्मणि लीयते ।।*
*तयैव वतेनं नित्यं साधनं बंधमुक्तये ॥६॥*

ज्या वृत्तीच्या योगाने मन परब्रह्माच्या ठिकाणी योग्यरीतीने लीन होते स्वान वृत्तीने नेहमी वर्तन करावे. तेंच बंधमुक्तीचे साधन आहे. ॥६॥

*एक एवहि भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः॥*
*एकधाबहुधा चैव भासते जलचन्द्रवत् ||७||*

प्रत्येक भूताच्या ठिकाणी एकच भूतात्मा आहे, चंद्र एकच असून पाण्यांत अनेक भासतात त्याप्रमाणे एकच आत्मा अनेक प्रकारांनी भासमान होतो. ॥७॥

*न वैराग्यात्परं भाग्यं नाहंकारात्परो रिपुः ।।*
*न गुरोरधिकं तवं न ज्ञानात्साधनं परम् ।।८।।*

वैराग्यापेक्षा मोठे असें भाग्य नाही. अहंकारापेक्षा मोठा असा शत्रु नाही. गुरूपेक्षा मोठे असें तत्व नाही व तत्त्वज्ञानापेक्षा मोठे साधन नाही. ।।८।।

*गुर्वनुग्रहतो योऽस्मिन् संसारे प्राप्तपूरुषः ॥*
*नृसिंहोऽसि च श्रेष्टोऽसि नाम्मा स्वानुभवे न च ॥९॥*

गुरुकृपेमुळे या संसारांत ज्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतलें आहे तो तूं नांवाने नरसिंह आहेस, श्रेष्ठ आहेस. (कारण सिंह म्हणजे श्रेष्ठ) पण आत्मानुभवाच्या दृष्टीने मात्र श्रेष्ठ नाहीस. (तुला ज्ञानप्राप्ति झाली असली तरी प्रत्यक्ष आत्मानुभव नाही.) ||९||

*रचना स्थलम् कॉफिउद्यान वनं चिक्कमंगळूर*
*रचना काल १८६५*

home-last-sec-img