Letters

पत्र.क्र. ४४

*© श्रीधर संदेश*

*।। श्रीराम समर्थ ।।*
*वाराणसी श्रीदत्त जन्मोत्सव शके १८८७*

*अखिल भक्त मंडळीस अनेक शुभाशीर्वाद.*

*’तुष्टेन भगवता ज्योतिर्मयेनात्मैव दत्तो यस्मात् तस्मात् उच्यते दत्त इति ।*
आज श्रीदत्तजयंतीचा मंगलमय सुखोदय आहे. अशा शुभसमयीं शिवतारकमंत्राचे अनुष्ठान संपूर्ण झाले आहे. स्वतः श्रीविश्वनाथ आपल्या भक्तियुक्त, पवित्रपावन अनुष्ठानामुळे अत्यंत संतुष्ट होऊन अतिप्रसन्नतेने वरदान देण्यास उद्युक्त झाले असून प्रार्थनेची प्रतीक्षा करीत उभे आहेत.
*’यस्मादुच्चार्यमाण एव गर्भजन्मव्याधिजरामरणसंसारमहाभयात् तारयति त्रायतेच तस्मादुच्यते तारम् ।*’ केवळ उच्चार केल्याने गर्भ, जन्म, व्याधी, जरा, मरण आणि संसारिक महाभय ह्या पासून आपणांस मुक्त करतो तोच तारक मंत्र होय. ह्या मंत्राच्या अर्थाप्रमाणेच आपले अनुष्ठान सफल होवो. आपण सर्व ह्या महाभाग्यामुळे कृतार्थ होऊन दिव्य जीवन व्यतीत करा !
*‘सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।*

*आपणा सर्वांचा मंगलमय आनंदरूप आत्मा*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img