Literature

अधिकारी वर्गाचे लक्षण

व्यवहारनिपुण, प्रसंगावधानी, समयसूचक, रिपुनिग्रहकोविंद, अनेक युक्तिप्रयुक्त्यांनी प्रयत्न करणारे, बुद्धिमान, आज्ञाधारी, दूरदृष्टि असणारे, ज्या त्या देशांतील लोकांर्शी वागण्याची पद्धत, त्यांचे त्यांचे सुखदुःख माहीत असणारे, मधुरभाषी, धैर्यशाली, अंतर्बाह्य शुद्ध, स्वामीभक्त, देवभक्त, कुलीन, धर्माभिमानी, धर्माकरितां देहार्पण केलेले कार्यकुशल, प्रामाणिक, सत्यसंध, इंद्रियमनोनिग्रही, आचारविचारशील, न्यायप्रिय, आत्मनिष्ठ अशाच सर्व अधिकारी वर्गाची तूं नेमणूक करतोस ना, भरता कार्यसाधक अशा बुद्धिमान गुप्तचरांकडून स्वपरराष्ट्राची अंतर्बाह्य परिस्थिति समजून घेऊन उपायांची योजना करीत असावें. अनुकूल साधनें निर्माण करीत असावें. गुप्तचरांचा विभाग अत्यवश्य व अति महत्त्वाचा असतो. स्वपरराष्ट्रांतील दूत पंडित, प्रतिभासंपन्न व अतिविश्वासू असावेत. साक्षर, आस्तिक व सात्विक ग्रजा असावी.

home-last-sec-img