Literature

अपौरुषेय वेद

अपौरुषेयवाक्यं वेदः । हें मीमांसकांचे मत सर्वमान्य आहे. कोण्या मानवाकडून रचला गेलेला हा वेद नव्हे. वेद ही ‘अमानवी देववाणी’ होय. वेद हा ईशप्रणीत आहे. ब्रह्मा देवानां प्रथमं संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता । विश्वाचा कर्ताभर्ता ब्रह्मदेव सर्व देवांच्या अगोदर पहिल्या प्रथम निर्माण झाला.

यो ब्रह्माणं विदधाति पूर्व यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । तह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये ॥

-ज्या परमात्म्यानें सृष्टिकरितां ब्रह्मदेवाला निर्माण करून, ‘सृष्टट्युत्पत्ति स्थितिलयाच्या’ वेदांना त्याच्याकडे पाठवून दिलें; म्हणजे वेद त्याच्या हृदयांत स्फुरविले, अशा आत्मबुद्धि उजळविणाऱ्या परमात्म्याला मुमुक्षु असणारा मी, त्या मोक्षाच्या प्राप्तिकरितां अनन्यशरण जातो. असा या मंत्राचा अर्थ आहे. अजून या मंत्रांतून काय निष्कर्ष निघतो तो पाहूं

home-last-sec-img