Literature

अयोध्येचे वर्णन

श्रीरामानें अयोध्येचे वर्णन याच अयोध्या कांडाच्या १०० व्या सर्गातल्या ४० ज्या पासून ते ४६ ज्या लोकापर्यंत केले आहे. अयोध्या ही एक अति वैभवसंपन्न राजधानी होती. सर्व तऱ्हेच्या संपत्तीने ही परिपूर्ण भरलेली होती. दाट वस्तीची ही सुंदर राजधानी अति विस्तृत होती. अति उंच अशा मनोहर प्रासादांनी हिची शोभा दुणावली होती.

ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैः स्वकर्मनिरतैः सदा । जितेंद्रियैर्महोत्साहैर्वृतामार्यैः सहस्रशः ॥ ४१ ॥ प्रासादैर्विविधाकारैर्वृतां वैद्यजनाकुलाम् । 

कञ्चित्सुमहितां स्फीतामयोध्यां परिरक्षति ॥ ४२ ॥

या अयोध्या नगरीतील सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादि प्रजाजन आपापल्या नियत कमांचेच अनुष्ठान करोत होते, असे यांत वर्णन आहे. यावरून रामराज्यांत वर्णाश्रम पद्धति ही कडक असावयाला पाहिजे हे उद्घोषित होते. सर्वच जितेंद्रिय व अति उत्साहपूर्ण असे होते हे या वर्णनांतून दिसते. रामराज्यांतील प्रजा अशीच असावयास पाहिजे हा सिद्धांत इथे प्रगटतो. ४६ व्या लोकांत ‘ विवर्जितो नरैः पापैः’ असा शब्दप्रयोग आहे. या आधुनिक रामराज्यांत सुद्धां अगदी असेच व्हावयाला पाहिजे. एखादा पापी देखील इथे असतां कामाचा नाहीं. मागील ४३ व्या श्लोकाच्या उत्तरार्धात ‘ देवस्थाने प्रपाभिश्च तटाकैश्चोपशोभितः । ‘ असें वर्णन आलें आहे, यावरून त्यावेळीहि मोठमोठी देवस्थानें होती हें स्पष्ट होतें. देवस्थान होती असें झाल्यास त्यावेळी मूर्तिपूजाहि होती असे सिद्ध होतें व बौद्धकाला नंतर मूर्तिपूजेचा प्रघात पडला हें मत निराधार ठरतें. पुराणश्रवण, वेदांत प्रवचन त्या त्या देवळांतून व ऋष्याश्रमांतून ठराविक वेळी नित्य होई. तिथे तिथे चालत असलेल्या वेदघोषानें अयोध्या भरून जाई. तिथे तिथे असणाऱ्या पवित्र पावन ऋष्याश्रमाचे दृश्य अति मनोवेधक होत असे. त्या त्या आश्रमांतील ऋषि व ऋषिपत्न्या यांचे वैदिकं आचार, त्यांचे ते त्यागमय परम पवित्र दिव्य जीवन, तो विद्यार्थ्यांचा सात्विक समूह मनावर अनिर्वचनीय पाकियाचा व अनंत आत्मीय आनंदाचा ठसा उमटवत असे. त्या त्या वेळी स्वाहास्वधाकाराचे घोष सर्वत्र ऐकूं येत असत. अयोध्येतील सारेच तें शुद्ध सात्त्विक दृश्य दिव्य, आत्मयि आनंदाच्या त्या अपार वैभवानें अत्यंत सुशोभित दिसे.

home-last-sec-img