Literature

अश्विन वद्य पंचमी

ब्राह्मणांच्यासाठी वेदाध्ययन आवश्यक आहे. सद्ग्रंथाचे अध्ययन करावे. श्रुति, स्मृति, पुराणादिकांतून वैदिकमत प्रतिपादिले असल्याने त्या ग्रथांचा अभ्यास करावा. आपआपल्या अधिकारानुसार श्रुति, स्मृति, पुराणें यातून सांगितलेली कर्मे यथाशक्ति करावीत. भक्तियुक्त अंतकरणाने परमात्म्याची आराधना करावी. सद्प्रवृत्ती ठेवून संसारामध्ये अंतकरणाने परमात्म्याची आराधना करावी. सद्प्रवृत्ती ठेवून संसारामध्ये आसक्त न होतां त्यांत असणाऱ्या दुःखकर गोष्टी, वाईट गोष्टी ध्यानांत आणून आपल्या मनाला ‘ त्यात दुःख आहे ‘ असे पटवून देऊन त्यापासून आपली सुटका कशी होईल ? आपण मुक्त कसे होऊ ? यासाठी प्रयत्न करावा. संसारसुख हेच सुख होय. ही जी भावना आपणांस निर्माण झाली आहे ती स्वानुभवाने घालवुन तिचा त्याग करून, नंतरच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निवृत्ती मार्गांचा अवलंब करणे शक्य असते. जे कर्म करावयाचे ते सर्व निष्कामच करावें, काम्यकर्म केल्याने आपणास पुन्हा जन्म चुकणार नाही म्हणूनच निष्कामकर्मच करावे.

*’ यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः | ‘*

परमात्म्याची कृपा प्राप्त होण्यासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच हा एक शास्त्रीय मार्ग प्रवृत्ती होय. सेवा या दृष्टीने त्यामार्गात राहून, तेथील मोहपाशांत न सापडता, त्यापासून होणाऱ्या दुःखाच्या अनुभवाने त्यामध्ये असणारी आसक्ती नाहिशी करून तदनंतरच निवृत्तीच्यासाठींच प्रवृत्ती ठेवावी व वैराग्य प्राप्त होण्यासाठीच संसार करावा.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img