Literature

आदर्श रामचरित्र

धर्मशः सत्यसंधश्च प्रजानां च हिते रतः । यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिर्वश्यः समाधिमान् ॥ १२ ॥ प्रजापतिसमः श्रीमान् धाता रिपुनिषूदनः । रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता ॥ १३ ॥ रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता । वेदवेदांगतत्त्वज्ञो धनुर्वेद च निष्ठितः ॥ १४ ॥ सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् । सर्वलोकप्रियः साधुरदीनात्मा विचक्षणः ।। १५ ।। सर्वदाभिगतः सद्भिः समुद्र इव सिंधुः । आर्यः सर्वसमचैव सदैव प्रियदर्शनः ॥ १६ ॥ स च सर्वगुणोपेतः कौसल्यानंदवर्धनः । समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवानिव ॥ १७ ॥ विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः । कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ॥ १८ ॥ धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापराः । तमेवं गुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमम् ॥ १९ ॥ (बा. रा.बा.स. १)

या श्रीरामाच्या आचार-विचारांतून त्याची ज्ञानविज्ञानसंपन्नता साहजिकच प्रगट होते. याचे शरणागतवत्सल्य अपूर्व आहे. प्रजाधर्म, राजधर्म, पितृधर्म, मातृधर्म, सतिधर्म, पतिधर्म, बंधुधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, प्रवृत्तिधर्म, निवृत्तिधर्म, व्यक्तिधर्म, समाजधर्म इत्यादि त्याला चांगले अवगत आहेत. तो सत्यप्रतिज्ञ असून त्याला दोनदां बोलणे माहीतच नाहीं. प्रजेच्या साबौगिक हिताविषयीं तो सदव दक्ष असतो. त्याची यशकीर्ति चोहीकडे पसरली आहे. तो सर्वज्ञ आहे. त्याचा स्वभाव अति सरल असून त्याचे अंतःकरण अतिशय शुध्द आहे. त्याच्या दर्शनाने लोकांच्या मनांत पवित्र भावनाच निर्माण होते. नरनारायणाप्रमाणे याचे बैराग्य आहे. प्रजेमध्यें हा प्रजापतीप्रमाणे शोभतो. हा सद्वृत्तिपोष सज्जनरक्षक, दुष्टसंहारक व आपल्या आचार-विचार आणि प्रचार द्वारा धर्माचे रक्षण करणारा आहे. विश्वरक्षणाच्या बाबतीत तर हा प्रत्यक्ष विष्णुच वाटतो. आपला क्षत्रियधर्म सोडून एक पाऊलहि हा इकडे तिकडे कधी टाकीत नाहीं. शाखांचा तत्त्वार्य त्याला चांगला अबगत असून आत्मविस्मृति त्याला कधीं होतच नाही. त्याची धारणाहि पण असाधारण आहे. विचारलेल्या वादग्रस्त प्रश्नांचीं तो योग्य व समर्पक उत्तरे देतो. समुद्राला आपोआप जशा सर्व नद्या येऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व लोक याला शरण येत असतात. याच्या सर्व लक्षणांनी हा आर्य वाटतो. सर्वांविषयींच्या समतोल वर्तनाने सर्वांना हा संतुष्ट करीत असतो. दर्शनमात्रेकरून आनंद उत्पन्न करणाऱ्या याच्या दर्शनार्थ मोठ्या उत्साहाने लोकांच्या झुंडीच्या झुंडी नित्य लोटतात. सर्व गुणालंकृत असा हा श्रीराम माता कौसल्येच्या आनंदसमुद्राला भरती आणणारा एक निष्कलंक चंद्रच आहे. शतकोटी मन्मथापेक्षांहि अधिक याचे सौंदर्य आहे. धरणीप्रमाणे याची धारणा आहे. बृहस्पतीप्रमाणें याची बुध्दिमत्ता आहे. यमधर्माप्रमाणे याचा दंड आहे. सर्वच याचें अवर्णनीय आहे. तशाच सबळ कारणाखेरीज श्रीरामाला कधीं क्रोध येत नाही. धर्माविरुध्द आचरण करून सज्जनांना अकारण पीडा देणाऱ्या उन्मत्त दुष्टांना मात्र तो कालाग्नीप्रमाणे भासतो; अन्यथा तो सदाच शांत असतो. क्षमा हा त्याचा उपजत गुण आहे. अत्युन्नत मानवधर्माचे धडे देणारें हें श्रीरामचरित नित्य पठनीय, मननीय आणि अनुकरणीय आहे.

अहं वेझि महात्मानं रामं सत्यपराक्रमम् । वसिष्ठोऽपि महातेजा ये चेमे तपसि स्थिताः ॥( वा. रा. बा. कां. स. १९-१४) यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीरामाला आपल्याबरोबर नेण्याकरितां आलेल्या विश्वामित्राचें हें वाक्य आहे. बाल्यावस्थेतच श्रीरामाचें सार्वांगिक थोरपण सर्व महात्म्यांना विदित होतें; असे यावरून स्पष्ट दिसतें. या श्रीरामाचे माहात्म्य काय हे मी एकट्यानेच जाणले आहे, असे नसून याचे माहात्म्य वसिष्ठांनाहि पूर्णपणे माहीत आहे; व जे जे आत्मतपोमग्न आहेत त्या सर्वांनाहि तें ठाऊक आहे. असे या वरील श्लोकांत विश्वामित्राने म्हटले आहे. या ठिकाण वेदाहमेतं पुरुषं महान्तम् । या वैदिक ऋचेची आठवण होते.

अयोध्या कांडाच्या प्रथम सगत ह्या ९ व्या श्लोकापासून ते ३२ व्या श्लोकापर्यंत व दुसऱ्या संगीत ह्या २८ व्या श्लोकापासून ते अध्याय संपेपर्यंत श्रीरामाचे वर्णन आहे. सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपतिसदृशो नास्ति देवो द्वितीयः हेच तत्त्व यांतून ओतप्रोत भरलें आहे. ‘दास म्हणे रघुनावाचा गुण घ्यावा’ या श्रीसमर्थ उक्तीची या ठिकाणी आठवण होते.

स हि रूपोपपन्नश्च वीर्यवाननसूयकः । भूमावनुपमः सूनुर्गुणैदशरथोपमः ।। ९

स च नित्यं प्रशान्तात्मा मृदुपूर्व च भाषते । उच्यमानोऽपि परुषं नोत्तरं प्रतिपद्यते ॥ १० कदाचिदुपकारेण कृतेनैकेन तुष्यति । न स्मरत्यपकाराणां शतमप्यात्मवत्तया ॥ ११ शीलवृद्धैर्ज्ञानवृद्वैर्वयोवृद्धैश्च सजनैः । कथयन्नास्त वै नित्यमस्त्रयोग्यान्तरेष्वपि ॥ १२ बुद्धिमान मधुराभाषी पूर्वभाषी प्रियंवदः । वीर्यवान्न च वीर्येण महता स्वेन विस्मितः ॥ १३ न चानृतकथो विद्वान् वृद्धानां प्रतिपूजकः । अनुरफ्तः प्रजाभिश्च प्रजाश्चाप्यनुरज्यते ॥ १४ सानुकोशो जितक्रोधो ब्राह्मणप्रतिपूजकः । दीनानुकंपी धर्मज्ञो नित्यं प्रग्रहवान् शुचिः ।। १५ इत्यादि( वा. रा. अ. स. १) 

-श्रीरामाचे चालणे, बोलणें सारेंच सुंदर आणि वीर्यवत्तर असतें. पृथ्वींत त्याला तोड नाहीं. परनिंदामत्सरादि दुर्गुणांनी तो सदाच रहित असतो. तो नित्य निर्विकार आत्मनिष्ट आहे. अगोदरच तो स्वतः मृदुमधुर शब्दांनीं सर्वांची विचारपुस करतो. एखादा मुद्दाम अथवा अजाणपणानें कांहीं कठोर बोलला तर उलट कांहीं न बोलतां उगीच राहातो व त्याच्यावर डावहि धरत नाहीं. कोणाशीं बोलावयाचे झाल्यास तो अत्यंत विनयानें संभाषण करून गोड शब्दांनी त्याचे समाधान करतो. कोणत्याहि भावनेनें कां होईना एकदां कां कोणी”त्याच्यावर कांहीं उपकार केला तर तो त्याकरितां सदैव ऋणी असतो. शेकडो अपराध झाले तरी आत्मबुद्धीने क्षमा करून युक्तीने तो त्यांना सुधारतो. शीलवृद्धांशी शीलाच्या, ज्ञानवृद्धांशीं ज्ञानाच्या, वयोवृद्वांशी पूर्वपूर्वीच्या शूरवीरांशी युद्धाच्या संबंधी तो संभाषण करतो. सज्जनांशीं तो अतिस्नेहाने बोलतो. तो बुद्धि खर्च करून परोपरी राष्ट्राच्या हिताकरितां जीवनोपयोगी निरनिराळी सुख-साधनें निर्माण करीत असतो. प्रिय तसेंच हितमित व अति मृदुमधुर असे त्याचे सत्य भाषण असतें. स्वतः लोकैक वीर असून देखील, वीर्यशौर्यादि त्याचे असे अनेक अलौकिक गुण असले तरी अणुमात्र त्याला त्याचा अहंकार नाहीं. खोटें बोलावयाचें कसें तें त्याला माहीतच नाही. अर्थाचा अनर्थ करून कधींहि तो आपली विपरीत भावना करून घेत नाही. तो तत्त्वदर्शी व सर्वज्ञ आहे. वृद्धांनी केलेल्या आदरसत्काराची दुपटीनें तो फेड करतो. तो प्रजेशीं जसा प्रीतीनें वागतो त्याप्रमाणे प्रजाहित्याच्याशी थागते. कर्मणा मनसा वाचा चक्षुषा च चतुर्विधम् । प्रसादयति यो लोकं तं लोकोऽनुप्रसीदति ॥ हें याच्या बाबतीत अगदी अक्षरशः खरे ठरते. कसल्याहि गोष्टींची तो उगीच घिसघिस लावीत बसत नाही. क्रोध त्याने जिंकला आहे. ब्राह्मणपूजेचा त्याला फार आनंद. तो दीनदयाळ आहे, आश्रितवत्सल आहे, सूक्ष्म धर्म त्याला सर्व माहीत आहे. सर्वदाच त्याचे आंखीव आचरण असतें. सदाचेच त्याचे वर्तन अति परिशुद्ध असतें.

वाल्मीकि रामायणाच्या अयोध्या कांडांतील प्रथम सर्गातल्या ९ व्या पासून १५ व्या श्लोकापर्यंतचे नमुन्यादाखल कांहीँ श्लोक वर दिले आहेत. विस्तारभयानें अधिक देतां आले नाहीत. वाचकांनी पुढचे ३२ पर्यंतचे श्लोक स्वतःच वाचून आचरणाचे धडे शिकावेत. या पुढच्याच ८ व्या सर्वांत पुन्ह २८ व्या श्लोकापासृन श्रीरामाच्या गुणवर्णनाला सुरुवात झाली आहे. दिव्यै र्गुणैः शक्रसमो रामः सत्यपराक्रमः । इक्ष्वाकुभ्योऽपि सर्वेभ्यो ह्यतिरिक्तो विशांपते ।। २८ ।। रामः सत्पुरुषो लोके सत्यः सत्यपरायणः । साक्षा द्रामाद्विनिर्वृत्तो धर्मश्चापि श्रिया सह ॥ २९ ॥ दान्तैः सर्वप्रजाकान्तै: प्रीतिसंजननैर्नृणां । गुणौर्वैरोचते रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः ॥४९॥ इत्यादि.

थोड्या फार प्रमाणांत श्रीराम-गुणानुवाद आहेच. निदुष्ट अशा दिव्य जीवनाचे मुळावरून हा संबंधच सगे वाचावा अध्यायाच्या शेवटपर्यंत यांत हे वर्णन म्हणजे एक अचूक मार्गदर्शनच होय. वाचकांनी याचा लाभ करून घ्यावा. जीवनांत वागावें कसें हें यामुळे आपल्याला उत्तमरीतीनें शिकतां येतें. श्रीरामाचें गुणवर्णन थोडें थोडें जें येथें केलें आहे तें याचकरितां.

home-last-sec-img