Literature

आर्यसंस्कृतीचा आदर्शपुरुष राम

आतांपर्यंत आलेल्या श्रीवाल्मीकि रामायणांतल्या श्रीरामाच्या वर्णनां तून त्याच्या शारीरिक, धार्मिक व आध्यात्मिक-संबंधींची माहिती अनेक प्रकारें आली आहे. आतां प्रसंगपरत्वें खुद्द श्रीरामाच्या मुखारविंदांतून बाहेर पडलेल्या त्या अमृतवचनांचा यथास्थान विचार करूं या. ज्याच्या नित्याच्या सहज आचरणांतून व प्रत्यहीं केल्या गेलेल्या स्वाभाविक विनोदांतूनहिं दिव्य विभूतिमात्र आपोआपच प्रगटतें तोच आदर्श पुरुष होय. या विधानाचे सत्यत्वहि श्रीरामचरित्रांतून पदोपदी डोळे भरून पाहावयास सांपडतें.

यश्च रामं न पश्येत्तु यं च रामो न पश्यति । 

निंदितः सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हते ॥

( वा. रा. अ. स. १७-१४)

जो रामाला व रामराज्याला बघत नाही, तो मनुष्य लोकनिंदित होतो, इतकेच नव्हे तर तो स्वतःलाच निंद्य समजतो. त्याचे मनच त्याला खाते, त्याचे त्यालाच तें लाजिरवाणे होते. याच्या अर्थाचा प्रत्येकानेच विचार करावा.

सर्वेषु स हि धर्मात्मा वर्णानां कुरुते दयां ।

चतुर्णा हि वयस्थानां तेन ते तमनुवताः

( वा. रा. अ. १७-१५)

श्रीराम सर्व वर्णांवरहि सारखी दया करीत. सर्व वर्णांच्या वयस्थांवर त्याची दयादृष्टि अधिकच होती. यामुळेच त्याच्या पाठोपाठ सर्व मंडळी वनाला निघाली. प्रेम द्यावें व प्रेम घ्यावें. एरवी कोण कुणाच्या पाठीमागें त्या घोर वनाला जाईल. प्रत्येकानेंच हा धडा वळविला पाहिजे.

अतोषयन्महाराजमकुर्वन्वा पितुर्वचः । 

मुहूर्तमपि नेच्छेयं जीवितुं कुपिते नृपे ॥ १५ ॥

यतो मूलं नरः पश्येत् प्रादुर्भावमिहात्मनः ।

कथं तस्मिन्न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ।। १६ ।।

home-last-sec-img