Literature

आर्योची विवाहपद्धति

कन्यां कनकसंपन्नां सर्वाभरणभूषिताम् । दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया || 

विश्वंभराः सर्वभूताः साक्षिणः सर्वदेवताः । इमां कन्यां प्रदास्यामि पितृर्णा तारणाय च ॥ (विवाह प्र. )

या वचनांवरून आर्यांच्या विवाहपद्धतीतील उच्च भावना स्पष्ट दिसून येतात : ‘ब्रह्मलोक जिंकण्याच्या इच्छेनें (मोक्षप्राप्तीकरितां) विष्णुस्वरूपी असणाऱ्या तुला मी कन्यादान करतों. ही सर्वाभरणभूषित सुलक्षण अशी आहे. या प्रसंगी मी तुला ही माझी कन्या अर्पण केल्याबद्दल विश्वांतून व्यापून असलेली भूतें, विश्वांतील सर्व देवता साक्षी आहेत.’ पितरांच्या उद्धाराकरितांहि हें मी कन्या दान करतो असा या संकल्याचा अर्थ. कन्यादानांत स्वतःच्या मोक्षाचा व पितरांच्या उदाराचा हेतु स्पष्ट दिसतो. कुठल्याहि ‘रजिस्टर्ड मॅरेजां ‘त असा कुठे कसला संकल्प दिसून येतो का ? आर्य विवाहपद्धतीत असणारे गांभीर्य, उच्च ध्येय, तात्विक दृष्टि उदास भावना इतर कठल्याहि विवाहांतून दिसून येत नाहीत. ‘दास्यामि विष्णवे तुभ्यं श्रीरूपिणी एषा मया दत्ता‘ या पदांवरून आयांची कन्या-जामातांच्या ठिकाणी असलेली लक्ष्मी नारायणाची भावना दिसून येते. आर्य संस्कृति सोडून बाकीच्या कोणत्या संस्कृतीत अशा तऱ्हेची उच्च भावना दिसून येते ! आर्य हे मूलग्राही तत्त्वज्ञान सोडून आणि मोक्षहेतु सोडून कधीहि चलायमान होत नाहीत. दुसऱ्या कशाचेहि चिंतन करीत नाहीत. त्यांच्या नसोनसी भरलेले तत्त्वज्ञान त्यांच्या अखिल कार्यातून सारखे प्रवाहित होत असते. आर्यांचा शीलस्वभाव या वरील वाक्यांनी स्पष्ट होत नाही काय ! अशा तऱ्हेच्या उच्च भावनेची उच्च कोटी असल्यामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ, या अर्थाने ‘आर्य’ म्हणून संबोधिले जातें व गौरविले जाते. आर्यांना वधुवरांच्या ठिकार्णी प्रकृतिपुरुषात्मक वस्तुस्थितीची यथार्थ भावना दृढमूल आहे. मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु मद्देश्वरम् । अस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥ या श्रुतिनिर्देशाचा आशय आर्यांच्या कार्यातूनहि व्यक्त होतो. अशा तात्त्विक विचारसरणीने व तान्त्रिक आचारसरणीनेंच अखिल विश्वाला मोक्षमार्गदर्शक होऊन आर्य हे जगद्गुरु ठरले. ह्यांनी आचरावयाचा धर्महि आतिल जीवांच्या मोक्षास कारणीभूत असल्यामुळेच या वैदिक आर्य धर्माला सनातन विश्वधर्म असे म्हणतात. आर्यांच्या विवाहांत जगाची कामुक दृष्टि नसून आर्यांना वधुवरांच्या ठिकाणी प्रकृतिपुरुषांचा ऐक्यरूप मोक्ष दिसतो. ही आयाँची थोरवी नी आर्य संस्कृतीची महत्ता ! ज्या कोणाला या आर्य संस्कृतीचे महत्व न समजून आपल्या अधिकाराच्या जोरावर ‘रजिस्टर्ड मॅरेज’ची पद्धत घालून द्यावी वाटते त्यांच्या बाबतीत फार कडक बोलावेसें वाटते. त्यांच्या हातून घडणाऱ्या कृतांमुळे लिहावेसे वाटते, पण त्यांचा गौरव राखावा म्हणून लिहू नये असेंहि वाटतें. तरीहि आर्यांना लांच्छनास्पद अशी त्यांची वेगळी जातच म्हणून कांहीं काढून टाकतां येत नाही ! आर्य संस्कृतीचा अर्थ त्यांना समजला नाही हे मात्र उघड आहे. अज्ञानतोऽध्यावशात्प्रकाश ज्ञाने विलीयेत विरोधतः क्षणात् ॥ विरुद्ध संस्कारानें, सहवासानें व अध्यासाने त्यांना असे वाटतें, त्याचा विरोध दिसून येऊन आर्य संस्कृतीचे यथार्थ ज्ञान यांना झाले की, या भावना सूर्योदयानंतरच्या काळोख प्रमाण आपोआप सर्व नष्ट होतील. अवाच्य कांहीं बोलण्यापेक्षां आपलेपणानें त्यांना वस्तुस्थितीचें ज्ञान करून देण्यांतच सर्वांचे हित असते. ज्यांना, स्त्रीपुरुषांतून घाणेरड्या इंद्रियभोगाचीच दृष्टि असते, किळसवाण्या देहाचीच कल्पना येते त्यांची कीव करावी वाटते. आपण सर्व मिळून वैदिक तत्वदृष्टीचा अभ्यास करूं या. वैदिक तत्त्वदृष्टीनें त्यांत दिव्य परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो.

कन्ये ममानतो भूयाः…. ..दानान्मोक्षमवाप्नुयात् ।बसे, अशी पुढें ये. तुला मी अर्पण करून मोक्ष मिळवितों. या वचनाचा अर्थ आर्य संस्कृतीतल्या पित्याला मुलीच्या ठिकाणींहि मोक्षसाधक सच्चिदानंद ब्रह्म तत्त्वाचाच साक्षात्कार होत असतो. ब्रह्म विश्वमिदं जगत् । ब्रह्म ब्राह्मण आत्मना अन्तरस्मिन्त्रिमे लोकाः । अन्तर्विश्वमिदं जगत् ॥ (तै ब्रा. २८ -७ ) हे सर्व जग ब्रह्मस्वरूपच आहे. ब्राह्मण स्वतः ब्रह्मच होय. त्याच्या अंतरंगांतच भूलोकादि सर्व लोक आहेत. हें आखिल विश्व खांतर्भूतच आहे, म्हणून वेदाचें सांगणे आहे. अर्धो वा एष आत्मनो यत्पत्नी । (तै. सं.) वैदिक संस्कृतीच्या माणसाला पत्नींच्या ठिकाणी आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचा शेषार्थ भागच दिसत असतो. मुलांतूनहि त्यांना आत्मरूपच दिसते.

home-last-sec-img