Literature

आर्य आणि आर्यावर्ताची लक्षणे

आर्यावर्त हा कोणत्या लक्षणांनी बाकींच्या राष्ट्राहून भिन्न म्हणून ओळखला जातो हें खालील श्लोकावरून स्पष्ट होईल. वर्णाश्रमविभागोऽयं यस्मिन्देशे न विद्यते । स म्लेंच्छदेशो विज्ञेय आर्यावर्तस्ततोऽन्तरः ॥ ( विष्णु स्मृति) ज्या देशांत वर्णाश्रमविभाग नाहीं तो ‘ म्लेंच्छ देश. ‘ वर्णाश्रमविभागांनी युक्त असणारा आर्यावर्त होय. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व प्रदेशांतून पूर्वीपासूनच वर्णाश्रमपद्धति अस्तित्वांत असल्यामुळे हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत आर्यावर्ताची स्थळमर्यादा पूर्वीपासूनच आहे व वर्णाश्रमधर्माचे निर्बंध पालन करणारे येथील सर्वहि लोक पूर्वीपासूनच आर्य आहेत हे यावरून सिद्ध होते. भारत व आर्य या शब्दांविषयी आपण विचार केला. हिन्दु आणि हिन्दुस्थान हे यांचेच प्रतिशब्द आहेत हेहि पण आपण ओळखले. अलीकडे तर हिन्दु आणि हिन्दुस्थान हे शब्द सर्रास वापरले जातात. आणि

आरशांत तोंड बघितल्याप्रमाणे पाश्चात्य पंडितांच्या लिखाणांतून आपली आर्य संस्कृति कशी दिसते ते वधूं. या उदाहरणांनी सिस्तधर्मीयांच्या व प्रचारकांच्या डोक्यांत प्रकाश पडेल, तत्प्रेमीयांनाहि कळून चुकेल अलीकडच्या सुशिक्षित वर्गाला व पुढारों वर्गालाहि एक धडा मिळेल.

“The custom of the country prohibits inter-marriage between the castes: for instance the husbandman cannot take a wife from the artisan caste. Custom also pro herdsman hibits any one from exercising two trades or from changing from one caste to another. One cannot for instance, become a husbandman if he is a herdsman or become a if he is an artisan.” (Mebindle: Metatheses p. 218)

या देशाच्या पद्धतीप्रमाणे मिश्रविवाह निषिद्ध आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार वर्ण आहेत. यांत कधीच रोटीबेटीचा व्यवहार होत नाही; इतकेच नव्हे तर एखाद्या शेतकऱ्याचा शिल्पकाराच्या मुलांशी विवाह होत नाही. त्याचप्रमाणे शिल्पकाराचाहि शेतकऱ्याच्या मुलांशी विवाह होत नाही. भारतांत त्या त्या जातीला नेमून दिलेला व्यवसायच त्या त्या जाती करतात. येथें अन्य जातींचा व्यवहार निषिद्ध ठरतो. अन्य जातीचा स्वीकार करणेहि पण अगदी निषिद्ध मानले जाते. उदाहरणार्थ, धनगरास कुणबी होता येत नाहीं व कुणबी धनगर होऊं शकत नाही, तर मग ब्राह्मण क्षत्रिय होणे, क्षत्रिय वैश्य होणे व वैश्य शूद्र होणे हे दूरच राहिले.

चांभार, महार, मांग, भंगी, ढोर इत्यादि अतिशूद्रांतन देखोल रोटी बेटीचा व्यवहार तर दूरच राहिला पण एकमेकाच्या हातचे पाणीसुद्धां आजहि ते पीत नाहीत.

‘जातीभेद वेदकालीन नव्हे’ या आक्षेपास डॉ. कोथ के इतिहास भारताचा उल्लेख करतांना काय उत्तर देतो ते पाहू.

आर्य आणि आर्यावर्ताची लक्षण

“The Rigweda certainly knows of a ruling class, Kshatriya, and the Vedic kingship was normally hereditary………. There are traces, moreover, of the devision of tribe into the holy (Brahman), the kingly (Kshatriya) and the commonalty. ” (Keith, Cambridge History. p. 93-94 )

शासक क्षत्रिय जातीचा परिचय ऋग्वेदास चांगलाच आहे. वेदकाली सुद्धां राज्यपद हें वंशपरंपरागत होते. इतकेच नव्हे तर त्या वेळींहि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि या खालील शूद्रादि जन्मगत जाती समाजांत प्रचलित होत्या याचा उल्लेखहि पण सांपडतो

“There is a good reason to believe that in the period of the Rigweds the Priesthood and the Nobility were hereditary.” (Cam bridge History p. 126) 

ऋग्वेदकालीहिं जन्मानेच ब्राह्मण क्षत्रियादि जाती होत्या, कर्माने

नव्हे, हें विश्वसण्यास तशींच सबळ कारणे आढळतात. वर्णसंकराबद्दल याचे काय म्हणणे आहे ते पाहू.

“There is no instance recorded in Vedic texts of a Vaishya rising to the state of a priest or prince” (Cambridge History p-127)

–वैश्यानें आपली उन्नति करून घेऊन ब्राह्मणत्व अथवा क्षत्रियत्व संपादन केल्याचें एकहि उदाहरण वैदिक वाङ्मयांत आढळून येत नाही.

“The caste system existed substantially in the time of Yajur veda.” (Cambridge History p. 55)

यजुर्वेदकालींहि वर्णव्यवस्था चांगलीच प्रचलित होती.

“It is probable enough that among the Sudras themselves there were rules of endogamy………… The Vedic Aryans and the aborigines alike married within the tribe. ” (Ibid p. 129 )

शूद्रांमध्ये सुद्धां आपआपल्या जातीतच विवाह करण्याचे नियम होते. वैदिक आर्य तसेच अनार्य हे आपआपल्या जातीतील वधूंशींच विवाह करीत असत.

“The first is called the Brahmanas, men of pure conduct. They guard themselves in religion, live purely and observe the most correct principles. The second is called the Kshatriyas, the royal caste. For ages they have been the governing class. They apply themselves to virtue ( humanity) and kindness. The third is called Vaishyas, the merchant class; they engage in commercial exchange, and they follow profit at home and abroad. The fourth is called Sudra, the agricultural class; they labour in ploughing and tillage. In the four classes purity or impurity of caste assigns everyone to his place……… They do not allow marriages between relatives. A woman once married can never take another husband.” (Beal Hiuentsang, PP. 79-80)

हुएनत्संग या पाश्चात्य पंडितानें प्राचीन भारतांतील वर्णविभागाविषयीं काय लिहिले आहे ते पाहूं.

चातुर्वर्णांपैकी पहिल्या वर्णास ब्राह्मण असे म्हणतात. हे पवित्र आचरणाचे असतात. यांना धर्माचेच कवच असते. यांचे जीवन पवित्रपावन असतें. अचूक मूलप्राही सिद्धान्तांचे परिशीलन, ते आंगवळणी पाडून घेणे हे त्याचें शीलच असतें. दुसऱ्या जातीला क्षत्रिय असे नांव आहे. हा राजवंश. पुरातन कालापासून राज्य करीत आलेली जात ही मनुष्यत्वाला अनुरूप असणारे सर्व परोपकारादि सद्गुण यांच्या ठिकाणी असतात. दया दान-धर्म हे यांच्यांत पूर्णपणें वास करून असतात. तिसरी जात म्हणजे वैश्यांची. हा व्यापारी वर्ग, अर्थात व्यापार हाच याचा व्यवसाय असतो. देश-विदेशांतून क्रयविक्रयाच्या योगानें लाभ संपादन करणे हाच यांचा उद्योग चौथी जात शूद्रांची होय. कृषि हेच यांचे जीवन जमीन नांगरणे, धान्य पेरणें हाच यांचा व्यवसाय. या चार जातीतील शुद्धाचारांचे तारतम्य हेच त्या त्या जातीची स्थळमर्यादा आंखून देते. यांच्यांत सगोत्र विवाह निषिद्ध आहे. कोणतीहि विवाहित स्त्री कधीहि पुनर्विवाह करीत नाहीं.

“The Brahmans study the four Vedashastras. The teachers must themselves have closely studied the deep and secret principles they contain and penetrated to their remotest meaning.’

— ब्राह्मण चार वेद व सहा शास्त्रे यांचा अभ्यास करतात. आचार्य – अध्यापकांना वेदांच्या गंभीर आणि गूढ प्रमेयांचा खोलवर विचार करून मूलगामी सूक्ष्म दृष्टीने त्यांचा पूर्ण शोध करून त्यांचे रहस्य उलगडून अंगवळणी पाडून घ्यावे लागते.

“When they have finished their education, and have attained thirty years of age, then their character is formed and their knowledge is ripe. When they have secured an occupation, they first of all thank their master for his attention.

“There are some, deeply versed in antiquity, who devote themselves to elegant studies, and live apart from the world, and retain the simplicity of their character. These rise above mundane pursuits and are as insensible to renoun as to the contempt of the world. Their name having spread afar, the Rulers appreciate them highly, but are unable to draw them to court. The chief of country honours them on account of their ( Mental) gifts, and the people exalt their fame and render them universal homage. This is the reason of their devoting themselves to the studies with ardour and resolution, without any sence of fatigue. (Beal Hiuen tsang, p. 83.)

– ज्या वेळी ब्रह्मचारी आपले अध्ययन पूर्ण करून तीस वर्षांच्या वयाचे होतात, तेव्हां त्यांचे लौकिक व पारमार्थिक व्यक्तिमत्व आकारास येऊ न ज्ञानहि परिपक्क होते. आपल्या जीवनांत स्वतःला प्राप्त झालेलें विद्यानैपुण्य, यश, अधिकार आणि वैभव यांचे श्रेय सर्वप्रथम ते आपल्या गुरूलाच देतात, व हे सर्व गुरूच्या कृपेचेंच फळ मानतात. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरूंनी आपल्याकडे दक्षतेनें लक्ष पुरविल्याबद्दल कृतज्ञ असतात. अध्ययनान्तीं व्रत ज्ञतापूर्वक, शिष्य, मोठे परिश्रम सोसूनहि गुरुदक्षिणा देतात. त्यांपैकी कांहीं जण निवृत्तिमार्गानुगामी होतात. हे सृष्टीच्या उपक्रमोपसंहाराच्या ज्ञानाचे गाढे विद्वान असतात. उच्च अशा वेदान्त शास्त्राच्या अभ्यासासाठीच त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले असते. सांसारिक जीवनाचा यांनी त्याग केलेला असतो. जगाच्या व्यापापासून हे दूर असतात. विषयव्यामोह कसला तो यांना माहीतच नसतो. हे विरक्तीचे मूर्तिमंत पुतळेच असतात. यांच्यांत कसलीहि ऐहिक घडपड नसते. धन-कनक-कांता-पुत्रादिकांच्या मगरमिठीतून यांची कायमचीच सुटका झालेली असते. शीतोष्ण, निंदास्तुति, सुखदुःख, हानिलाभ यासारखी कसलीहि द्वंद्वे त्यांना बाधत नाहींत. यांना दिव्य सामर्थ्य प्राप्त झालेले असते. त्यांची कीर्ति चोहीकडे पसरलेली असते. राजे-महाराजांनाहि यांच्या ठिकाणी अत्यधिक भक्ति, विश्वास असतो. आपल्या दरबारांत व राजमंदिरांत नेऊन त्यांचा गौरव करावा, त्यांची विविधोपचारांनी सेवा करावी या उत्कट इच्छेनें त्यांची कितीहि प्रार्थना केली तरी ते त्यांना नको असते. ते आत्मानंदानंच तृप्त व तल्लीन असतात. त्यांच्या मनोजयादि अलौकिक गुणामुळे, असामान्य सामर्थ्यामुळे व दिव्य प्रभावामुळे राजे त्यांना पूज्य  मानतात, त्यांचा आदर राखतात. सर्व जनताहि त्यांची भक्त होऊन असते, सर्वच त्यांची कीर्ति वाखाणतात. मोठमोठ्या समुदायानिशी त्यांचा आदर सत्कार करतात. दुर्दम्य उत्साहानें, अचल धैर्यानें व अविश्रांत परिश्रमानें त्यांनी जे आपल्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला वाहून घेतलेले असते, तेंच त्यांच्या या सर्व पूज्यतेचे कारण असते हे जमत

Simple living and high thinking” साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वाच्या पूर्ण वास स्थानाचा शोध घेण्याकरितां निघालेल्या पाश्चात्यांना येथले ब्राह्मण पाहून कृतकृत्यता वाटली. कंदमूलादिकांचा आहार, वल्कलादि वस्त्र, अजातशत्रुत्व, सर्वसमत्व, सर्वभूतहित दृष्टि, निर्विषय आत्मतृप्ति, अचल समाधानाची शांतवृत्ति, निरुपद्रवी असे सरल आणि सुलभ जीवन, पराकाष्ठेचे उन्नत विचार इत्यादि हे असे पूर्वीच्या ब्राह्मणांचे नैसर्गिक गुण होते.

मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः । ”

तत्कालीन ब्राह्मणांना पाहिल्याबरोबरच या वाक्याचे सत्यत्व प्रत्यंतराला येई. त्यांचे दर्शन घेतल्याबरोबर ” स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला ” हे अगदी बरोबर मनांत बिंबे. एक मन जर नेहमी संतुष्ट असेल तर दरिद्री कोण आणि श्रीमंत कोण ज्याची हाव अधिक तोच खरोखर दरिद्री’ असा या वरील श्र्लोककचरणाचा अर्थ होतो. यो मे गर्भगतस्यापि वृत्ति कल्पितवान् प्रभुः । शेषवृत्तिविधानाय स कि सुप्तोऽथवा मृतः ॥ ज्या सर्वेश्वर परमात्म्यानें गर्भात देखील माझें संगोपन केलें, माझ्या जीवनाची जबाबदारी पत्करली तो आजहि आहेच की नाही ! तो झोपतहि नाही आणि मृतहि होत नाही, असे आहे तर मला माझ्या जीवनाची एवढी कां म्हणून चिंता लागावी ? आयुरन्नं प्रयच्छति-आयुष्यच अन्न पुरवितें, अशा दृढ विश्वासाने त्या वेळची ब्राह्मण जात अत्यंत निश्चित असे. वनोपवनांतल्या पवित्र वातावरणांत राहून आलेल्या विद्यार्थ्यांना पाठ सांगत ईश्वरचिंतनांत काळ घालवी. भोजनाच्छादने चिन्तां वृथा कुर्वन्ति मानवाः । योऽयं विश्वंभरो देवः स भक्तान् किमु पेक्षते। हे वाक्य त्यांच्याविषयीची साक्ष पटवील. अन्नवस्त्राच्या बाबतींत मानव उगीच काळजी वाहतात. विश्वाचेंच जो पोषण करतो तो परमात्मा आपल्या अनन्य भक्तांचे पोषण करणार नाही ? भक्तांची उपेक्षा करील ? हा या श्लोकाचा अर्थ अनन्याचितयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् । हें भगवंताचे वाक्य यांच्या बाबतीत सत्य होई. “ बाळक जाणेना मातेसी । तिचें मन तयापासी ॥ तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ || ” असा समर्थांचाहि अनुभव आहे. सत्तेच्या व ऐहिक वैभवाच्या शिखरावर असलेल्या राजांना सुद्धा हे अकिंचन ब्राह्मण प्रसंगीं परमेश्वराचें सर्वपोषकत्व ध्यानीं आणून देत असत, हें श्री समर्थ शिवबांच्या उदाहरणार्ने समजून येतें; खडकांतील बेडकीच्या गोष्टीची आठवण होते; त्यांचे “ आम्ही काय कुणाचें खातों रे । तो राम आम्हांला देतो रे । ” हे चरण ऐकूं येतात; “ खडक फोडितां सजीव बेडकी ” हें पद डोळ्यांपुढे उभे राहते. बाह्य दगदगीच्या जीवनाला कंटाळून, अनेक भौतिक सुखाच्या अधिकाधिक शोधांनी वाढत गेलेल्या विषयवासनांच्या दाहान होरपळून, • He whose wants are few, is happy ज्याच्या गरजा थोड्या तो सुखी’ या तत्वाचा पडताळा पटवून घेण्याकरितां निघालेल्या पाश्चात्य पंडितांना येथें आत्मसुखाचीं ‘ दोंदें ‘ येऊन निर्विषय तृप्तीची ढेकर देत असलेल्या ब्राह्मणांना बघून समाधान झाले. अशांपैकी एका ऑलिव्हर गोल्डस्मिथनें आपल्या देशांत गेल्यानंतर ‘ सिटिझन ऑफ दी चर्ल्ड नांवाचा एक प्रबंध लिहून प्रसिद्ध केला. त्या प्रबंधाचा कांहीं भाग डोळे भरून पाहून पोट भरून आनंद मानूं या. पूर्वीच्या ब्राह्मणाविषयीं वर्णावें तितकें थोडंच आहे. पण केवळ दीडशे वर्षांपूर्वीच्याच आमच्या पूर्वजांचे या वर्णनाच्या झरोक्यांतून दर्शन घेऊन तृप्त होऊं या

“Hail O! ye simple, honest Brahmanes of the East, ye nof fensive friends of all that were born to happiness as well as you, you never sought a short-lived pleasure from the miseries of other creatures. You never studied the tormenting arts of ingenious refinement. You never looked upon a guilty meal. How much more purified and refined are all your sensations than ours? You dis tinguish every element with the utmost precision, a stream un tested before is a new luxury, a change of air is a new banquet too refined for western imaginations to conceive.”

–साधु जीवनाच्या सरळ आणि परिशुद्ध पौर्वात्य ब्राह्मणांनो, तुमचा अखंड जयजयकार असो. तुम्ही धन्य ! धन्य ! तुम्ही जगन्मित्र आहां, तुम्हीं विश्वबंधु आहां, तुमच्याप्रमाणेच सत्य सुख संपादून कृतकृत्य होण्याकरितां जन्मास आलेल्या सर्वांवर तुमचे हार्दिक निःस्वार्थी प्रेम आहे. कोणालाहि कसलाहि उपद्रव न होईल अशा तन्हेचें निरुपद्रवी जीवन तुमचें. स्वार्थ करितां दुसऱ्यांना पिळवटून, त्यांचे सुख हरण करण्याची दुर्बुद्धिं तुमच्या ठिकाणी नाही. दुसऱ्यांना पीडा देऊनच प्राप्त होणाऱ्या व दुसऱ्यांच्या दुःखा कष्टांनी थबथबलेल्या क्षणभंगुर सुखाच्या पाठीमागें तुम्ही कधींच लागला नाही. प्रगतीच्या व नागरिकतेच्या पडद्याआड सभ्यतेने परपीडा करण्याचे चातुर्य शिकविणाऱ्या, आध्यात्मिक उन्नतीला विघ्नरूप असणाऱ्या अनैसर्गिक सुधारणेच्या भौतिक विद्या केव्हांहि तुम्ही शिकलांच नाहीत. अशा तऱ्हेची प्रवृत्तीच तुमच्या ठिकाणी नाहीं. सर्वसामान्य लोकांच्या तोंडाला पाणी सुटण्यासारख्या चटकदार, मांसादि उत्तेजक आहाराकडे तुमची दृष्टि चुकूनहि जात नाही. तें तुमच्या दृष्टीने पाप ठरते. त्यांत निरपराध प्राण्याची हिंसा होतें, ही जाणीव तुम्हांला असते. या बाबतीत आपल्यासारखेच सर्व प्राण्यांना तुम्ही समजतां. आमच्या या आचारविचारांपेक्षां तुमचा तो पुण्यपावन आचारविचार पराकाष्ठेचा परिशुद्ध आहे ! उन्नत भूमिकेची उच्च नीति तुमची. विश्वादर्श पवित्रपावन जीवन तुमचे. त्यांत आध्यात्मिक विकास आहे. तुमची सदसद्विवेक शक्ति अगाध आहे. पंचभूतांचे व त्यांच्या कार्यांचे तुम्ही बिनचूक गुण जाणतां. प्रतिभूतांच्या उत्पत्तीचा यथार्थ परिचय तुम्हांला आहे. पंचभूतांचे व पांच भौतिक शरीरादिकांचे पृथ:करण करून तुम्ही यथार्थ परमात्मस्वरूप निवडून घेतां. निसर्गरमणीय स्थळी ध्यानासक्त होऊन बसणें हेंच तुम्हांला अतिशय सुखाचे वाटते. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे निर्मळ झरे, नवीन नवीन प्रवाह, रमणीय नया, दिव्य सरोवरें डोळ्यापुढे आली म्हणजे तुमच्या डोळ्याचे व मनाचे पारणे फिटते. स्नान-संध्या करणे म्हणजे तुमचें नित्य नूतन भोग सुख शहरांतील कृत्रिम वातावरण टाकून, संसारसुखाचे कल्पित वातावरण सोडून, निसर्गरमणीय असा पवित्र एकान्त सेवन करणें हेंच तुमचें मेजवानीचे जेवण, पंचपक्वान्नांचें भोजन, एक मोठा सण, पाश्चात्य सुधारणेच्या तर्क शक्तीला अंदाज बांधण्यासहि अशक्य होणारें, अगदीच अपरिचित असणारे, परमरमणीय, परमविशुद्ध, परमपावन जीवन तुमचें हें !

विदेशी आणि विधर्मी म्हणविणाऱ्या गुणग्राही पाश्चात्य पंडितांनी निःपक्षपातानें, आपल्या देशधर्माचा दुरभिमान सोडून केलेल्या या वर्णनांत आर्य संस्कृतीचे महत्व सांठविलें आहे. त्यांचे औदार्यहि उठून दिसते. ब्राह्मण आणि भारतीय संस्कृतीकडे पाश्चात्य किती गौरवपूर्ण, महत्त्वपूर्ण दृष्टीने पाहतात

हें याचरून कळून येईल, खिस्त-धर्म प्रचारकांचीहि दृष्टि विशाल होईल. आमच्या संस्कृतीविषयीं तुम्ही आदर बाळगीत असाल, ग्वाही देत असाल तर मग आम्ही तींवर विश्वास ठेवूं, असे पाश्चात्य पंडितांजवळ सांगण्याचा प्रसंग गुदरलाच तर ते आपलें हृदय उकळून आर्य संस्कृतीचे महत्त्व दाखवितील व पूज्यत्व आणि प्रेम व्यक्त करतलि यांत कांहीं संशय नाही. याला हीं वरलि वाक्यच प्रमाण आहेत.

आर्य संस्कृतीविषयीं पाश्चात्य पंडितांचे प्रेम, आदर व भक्ति इतक्या कोटीची श्रेष्ठ असल्यानंतर त्या संस्कृतीच्याच हिंदुजनांची कशी व किती असावयाला पाहिजे हें कैमुनिक न्यायानेच सिद्ध होते. वर्णव्यवस्थेविषयीं, ब्राह्मणांच्या आदर्श जीवनाविषय पाश्चात्यांचा आदर पुष्कळशा भारतीयांना आपले मत बदलावयाला लावील, ब्राह्मण जातीविषयीं आदर उत्पन्न करील यांत संशय नाहीं. आर्य संस्कृतीच्या प्रमाण ग्रंथांतून ब्राह्मण जातीला जरी गुरुत्व दिलें असले तरी समाजाच्या सुव्यवस्थेला सर्वांची सारखीच आवश्यकता दाखविली आहे. त्याच्या त्याच्या पूर्वार्जित संस्काराच्या अनुरूप भावी जीवनाला अनुकूल होण्याकरितां त्या त्या वर्णांत त्या त्या जीवांचा जन्म ईश्वराज्ञेनें होत असतो. यांच्या जन्म-धर्म-कर्मादिकांत असणारी भिन्नता म्हणजे एका देहाच्या शिर, बाहू, मांड्या व पाय असावेत त्याप्रमाणे आहे. विश्वरूपी परमात्म्याच्या या अवयवापासूनच त्यांची क्रमानें उत्पत्ति झाली. या वर्णाचें मूळ एक पर मात्मा आहे. त्याच्या अखंड देहांत या सर्वांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे येथे कोणी तशी द्वेषासूया निर्माण करणारी कोणतीहि कुहक भावना उत्पन्न करूं नये व करून घेऊं नये हें स्पष्टपणे शिकविलें आहे.

home-last-sec-img