Literature

आर्य संस्कृति हा मोक्षप्राण होय

आर्य संस्कृतींत जीवनधर्म व मोक्षधर्म असे दोन प्रकारचे धर्म आहेत. जीवनधमौत थोड्याफार फरकानें प्रवृत्तिमार्ग येतो व मोक्षधर्मांत थोड्याफार फरकानें निवृत्तिमार्ग येतो. आर्य संस्कृतीत धर्मार्थकाममोक्षेषु मोक्ष एव परम पुरुषार्थः तस्य नित्यत्वात् । – धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुपुरुषा त्याच्या नित्यत्वामुळे मोक्षच एक परमपुरुषार्थ म्हणून म्हटला आहे. जीव ब्रह्मैक्यच एक आर्य संस्कृतीचा अंतिम सिद्धान्त आहे. जीवनधर्मांत सामाजिक विकासाला बाब मिळतो, प्रवृत्तिधर्माला प्रवेश मिळतो. हा अभ्युदयाचा मार्ग आहे. पूर्वजन्माच्या गुणकर्मविभागाप्रमाणें झालेल्या ईशसंकल्पानुसार वर्णविभा गांचा अन्तर्भाव या अभ्युदयांतच होतो. देशकालानुसार परस्परांशीं वागण्याचे आचार-नियम, सामाजिक जीवनक्रम या अभ्युदयांतच मोडतात. ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम जीवनाच्या भिन्न अवस्थाधर्मांत 

अन्तर्भूत होऊन वर्णव्यवस्था ही सामाजिक जीवनाचा विकास दाखविते व आश्रमव्यवस्था वैयक्तिक जीवनाचा विकास दाखविते. परमात्मप्राप्तीच्या एका ध्येयबिंदूंत या सर्व वर्णाश्रमवर्मांचा अन्तर्भाव होतो. परमात्मप्राप्तीच्या एका सूत्रांत वर्णाश्रमधर्म ओवले गेले आहेत. आर्य संस्कृति ही मोक्षपाणि व मोक्ष प्राण आहे. आर्य संस्कृति मोक्षाचे ध्येय सोडून कोणत्याहि कार्याला हात घालीत नाही. अनेक जलाशयांतून एका जलतत्त्वाचीच व्याप्ति डोळसाला दिसत असल्याप्रमाणे या आर्य संस्कृतीला अनेक नामरूपांत, अनेक भिन्न भिन्न धर्मांत, सर्व विविधत, अखिल भेदांत, अखिल व्यवहारांत एक आनंद घन परमात्मतत्त्वच दिसून येतें.

परमात्मविश्वसित वेदाप्रमाणे, वेदानुसारी स्मृतींप्रमाणे, आदर्शभूत व्यक्तीच्या आदेशाप्रमाणे, स्वस्त्रवर्णाश्रमोक्त कर्मउपासना आर्य संस्कृति उपदेशिते. आत्मानात्मविवेकानें परिशुद्ध झालेल्या मनःतृप्तिकर विचारांचा आर्य संस्कृति प्रचार करते. निरतिशय सुखप्राप्तीकरितां नेमलेल्या आदर्श मानवी जीवन क्रमाचा आर्य संस्कृतीत अन्तर्भाव होतो. जगज्जनक परमात्म्यानें उप देशिलेल्या कल्याणकर प्रवृत्तिनिवृत्तिधर्माचे अति प्राचीन संस्कार या आर्य संस्कृतीत आहेत.

home-last-sec-img