Literature

आर्य संस्कृतीची लक्षणे व कार्य

भारताच्या आधुनिक राजकीय पुढाऱ्यांवर रशियाच्या साम्यवादाचा बराच पगडा बसल्यासारखा दिसतो. त्याच्या धर्तीवर सुधारणा दिसत आहेत. कायद्यानें अमलांत आणण्याची दंडेलशाहीहि थोडी थोडी डोकावत आहे. आर्यांची आनुवंशिक परंपरापद्धति त्यांना संकुचित वाटते. विश्वांतील सुखाची कल्पना अनाठायीं वाटते. ईश्वराचे अस्तित्व, त्याचे नियामकत्व, त्याचे कर्मफलदातृत्व, कर्मानुरूप जीवांचे फलभोतृत्व, पूर्वकर्मानुरूप प्राप्त झालेले त्यांच जातीयत्व, प्रतिप्राणिपदार्थाचे भिन्न गुणधर्मित्व या त्यांना गंजलेल्या जुनाट कल्पना वाटतात. जगांतील स्वाभाविक विविधत्व व भिन्नत्व काढून टाकणे शक्य नसल्यामुळे स्त्रीपुरुषांचे, जातीयतेचे प्रतिप्राणिपदायाचे ते ते स्वभावसिद्ध गुणधर्म राष्ट्राच्या ऐहिक पारलौकिक हिताच्या व सुखाच्या दृष्टीनें अनुकूल करून घेऊन कायम ठेवलेल्या त्यांच्या विविधतेंतून, भिन्नतेंतून व उच्चनीचतेतून अद्वितीय परमात्मस्वरूपाचे, आंतरिक साम्य राखण्याचे, पाहण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे वैदिक धर्मतच त्यांना अगदी केवळ भोळसट वाटते; आणि त्यांच्या अपक्क बुध्दीच्या तरुण कल्पनांना राशियाचा साम्यवाद रुचतो. केवळ ऐहिक दृष्टीनेच आपला जीवनक्रम चालविणारी जाति, धर्म, आस्तिकता, पारलौकिक साधन इत्यादि सर्व सोडून रानांतल्या पशुपक्ष्यांप्रमाणे मोकळ्या जीवनाची अशी एक अखंड जात भारतांत केव्हां पाहूं असें त्यांना झाले आहे. उच्च पातळीच मुळी काढून टाकून सर्वांनाच खालच्या एका पातळीवर आणून ठेवावे म्हणून त्यांचे अव्याहत प्रयत्न चाललेले दिसतात. शरीराच्या उन्नत अवनत अंगप्रत्यंगांना एका प्रकारचेच रूप देण्याच्या प्रयत्नासारखाच हा कांहींसा प्रयत्न होऊं शकेल.

ईश्वरी सत्ता, ईश्वरी न्याय, ईश्वरी जगत्, ईश्वरी वेदवाङ्मय, कर्मफलानुसार ईश्वरी दंड, पूर्वजन्मार्जित गुण, कर्मस्वभावानुसार जन्मानें प्राप्त झालेल्या जातीची समाजव्यवस्था, ब्रह्मचर्यादि आश्रमव्यवस्था, एकपत्नीत्व, पातिव्रत्य, सत्य, अहिंसा, दानधर्म, परोपकार, दया, वैदिक धर्मश्रद्धा, परस्पर सहानुभूति, गोड वर्तन, शुद्ध आचारविचार, अंतर्बाह्य पावित्र्य, तात्त्विक दृष्टि, एकात्मस्थिति, अपरिहार्य भेदाचा तात्त्विक दृष्टीनें उपयोग करून घेऊन सुखशांतनं जीवन चालविणें, परगोत्राच्या सजातीय कुलीन वधूर्शी लग्न करणें, तद्व्यतिरिक्त स्त्रियांत मायबहिणीची दृष्टि ठेवणें, सचोटीनें पैसा मिळविणें, श्रुतिस्मृतिपुराणोक्त कर्म उपासना चालविणें, ज्ञानसाधनाचे अनुष्ठान करणे, होईल तितक्या त्यागपूर्ण उच्च न्यायनीतीचा आश्रय करून उच्च सभ्यतेनें वागणे, आदर्श नागरीकतेनें वागणे, मातृभक्त, पितृभक्त, देवभक्त व गुरुभक्त असणे, श्रुतिस्मृति आदिक मान्य ग्रंथांना प्रमाण मानणे, सर्वहितकारक अशा उत्कट भव्य भारी आदर्श गुणांच्या स्थावर जंगमात्मक प्राणिपदार्थांतहि सर्व जातीच्या मनुष्यांतहि पर मात्मविभूतींची दृष्टि ठेवून अश्वत्थ, तुळशी, गाय, साधुसंत, अवतारी यांच्या ठिकाणी आदर, पूज्यता ठेवून वागणे, मूर्तिउपासना करणे, प्रपंचवासना व स्वरूपाचे अज्ञान असेपर्यंत कर्माप्रमाणे जन्म मानणे, प्राणी मरणोत्तर स्वकर्म फलाकरितां भिन्न भिन्न लोकी जातो याचा विश्वास धरणे, श्रुत्युक्त देवदेवता, त्यांचे लोक व अधिकार मानणे, त्या त्या फलाच्या दृष्टीने त्यांचे त्यांचे मंत्र-यज्ञ यागादिकांचे अनुष्ठान करणे, अद्वैतनिष्ठेचे पूर्ण ज्ञान होईपर्यंत, कर्म-उपासना ज्ञान यांचे त्या त्या वर्णविधियुक्त अनुष्ठान करणे व पुढे जीवन्मुक् होईल तितकें सर्वतोपरि लोकोपकारक कार्य करीत आत्ममात्र स्थितीत असणे, ही आर्य संस्कृतीची लक्षणे आहेत. परमात्मप्राप्तीच्या ज्ञानसाधनानें ज होतो व मग त्याला भेद वैविध्य जन्मसंसारादि कांहींच नसते, तो सच्चिदा नंदरूप ब्रह्मात्म तत्त्वच एक होऊन असतो इत्यादि वैदिक धर्माची तत्त्वे आर्य संस्कृतींतून रूढ आहेत. हिला वैदिक अथवा आर्य-संस्कृति म्हणतात.

श्री. डॉक्टर भगवानदासजींनी आपल्या (Science of Self) ‘आत्म ‘विज्ञान’ या ग्रंथांत आर्य संस्कृतीबद्दल काय लिहिलेलें आहे ते पाहू.

“It is the ancient Socialism which some are convinced is truly scientific because based on the science of Psychology the most important of all sciences as is being widely recognized in the West now; while modern Socialism (or Communism) which calls itself scientific fails to be so, because it ignores and even goes positively against some fundamental facts and laws of human nature and therefore will fail to realize its objective, and fail exactly in the degree in and to the extent which it violates those facts and laws.

All this world of objects, which is named by the word “this” is made of and by ideation and hence none who knows not the Science of the Self can carry action to fruitful issues.

“He who knows the inner purpose of the laws of process and it’s orders ideated by the self-existent, he alone can rightly ascertain and enjoin the rights and duties of the different classes of human beings, of their social Occupations (Varnas) and Vocations and on their Asrams, ‘stages in life’. “

– पुष्कळांना निश्चित असा विश्वास आहे की, आर्यांचा प्राचीन समाजवाद हा अध्यात्माचर उभारला असल्यामुळे खरा शास्त्रीय समाजवाद आहे. अध्यात्मशास्त्र हे सर्व विज्ञानशास्त्रांचेहि मूळचें मुख्य असे महत्त्वाचे शास्त्र आहे

म्हणून आता बहुतेक सर्वहि पाचात्य मानतात. आधुनिक समाजवाद अचा साम्यवाद शास्त्रीय समजला गेला तरी तो त्या बाबतीत पुष्कळ लंगडा पडतो. त्यांचे सिद्धान्त त्रिकालावाचित निसर्गाच्या मुख्य तत्त्वाविरुद्ध असल्यामुळे व ते मानवी स्वभावाला अथवा धर्मालाहि तितकेसे जुळत पण नसल्यामुळे ते आपल्या ध्येयाला गाडू शकत नाहीत. जितक्या अंशाने ते मूलग्राही सिद्धांतांना सोडू आहेत तितक्या अंशाने ते केव्हांहि तत्त्वनिदर्शनाच्या बाबतींत थोडेच पडतील, अपूर्णच राहतील, तितके ते मानवस्वभावाच्या व प्राकृतिक नियमाच्या विरुद्धच जातील.

सर्व भोग्य पदार्थोंचे व दृश्य पदार्थांचे जग, ज्याला आपण ‘हे’ म्हणून संबोधितो, ते कोणत्यातरी एका भरीव तत्त्वाचे बनून विशिष्ट व्यवस्थेच्या दिव्य आधाराने जीव धरून आहे. जो हे आत्मतत्त्व जाणत नाही त्याच्या क्रिया त्यांच्या पूर्ण अर्थानें सफल होत नाहीत. ( न ह्यनात्मवित्कश्चित्क्रियाफलं समश्नुते ) कायदे, नियम, साधन, विधान व सर्वांचे जीवन यांच्या आंतील तत्त्व जो जाणतो, जो हैं सर्वहिं आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरितांच आहे म्हणून ओळखतो, या सर्वांनाहि एक आत्मतत्त्वच आधार आहे अशी जो खूणगांठ बांधतो तोच एक केवळ सर्व ओळखतो व मानवांच्या भिन्न भिन्न कार्यक्षेत्रांतल्या पूर्वजन्मार्जितपणे लाभलेल्या जीवनाच्या भिन्न जातीची, तशीच मानवी ! आयुष्याच्या भिन्न भिन्न अवस्थारूप आश्रमांची कर्तव्येहि पण तितक्याच ‘सुखासमाधानाने बिनचूक पार पाडतो.

home-last-sec-img