Literature

आषाढ वद्य एकादशी

आवरण, विक्षेप हीच समाधीची विघ्ने होत. आवरण नाहिसे झाल्याशिवाय देहात्मबुध्दी होणार नाही.
देहात्मबुध्दीची जाणीव झाल्याशिवाय वैषयिक कल्पना म्हणजेच विक्षेप नाहीसा होणार नाही. मन वाटेल
तिकडे धावत सुटत असते. स्वरूपाचे आवरण- विक्षेप यानी युक्त असे जे विचार चित्तांत असतात त्यामुळे
आत्मरूपाची जाणीव म्हणजेच चित् किंवा ज्ञान यांच्यामध्ये आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे जडरूप देहादी
नामरूपाचे आभास जलतरंगाप्रमाणे उत्पन्न होतात व ते अति चंचल असतात. चित्तामध्ये अशारितीने जड,
नाम, रूपे आणि त्यांची जाणीव करून देणारे जे चित् या दोघांच्या संमिश्रपणाला 'चिज्जडग्रंथी' असे
म्हणतात.'चित्त' या शब्दांचे स्पष्टिकरण 'चित्+त' अशाप्रकारे होते. 'चित्' म्हणजे आपले निश्चल
सुर्यप्रकाशवत् आनंदरूप प्रकाशाने प्रकाशणाऱ्या आत्मरूपाची जाणीव व 'त' म्हणजे आरशांत दिसणारा
प्रतिबिंबरूपी आभास किंवा अनेक नामारूपानीयुक्त असा विषयांचा चंचलाभास होय. आरशांत ज्याप्रमाणे
आभास उत्पन्न होतो त्या वस्तू काढून टाकल्यास निराभास म्हणजेच पुर्वीप्रमाणे निश्चल असा फक्त
आरसाच शिल्लक रहातो, तसेच 'चित्' मध्ये जलतरंगाप्रमाणे नामरूपाचा जो चंचल आभास आहे त्याला
उत्पन्न करणाऱ्या अनेक संस्काराचा म्हणजेच 'त' काराचा अथवा जगचित्राचा त्याग केल्यास निराभासपणे
नेहमीच्या स्वरूपांत निव्वळ असे एक चित् म्हणजेच ज्ञानानंदस्वरूपी आत्मरूपच शिल्लक रहाते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img