Literature

आषाढ वद्य चतुर्थी

दुष्ट, मुर्ख, आततायी हे क्रोधी मनुष्यास जितके भितात तितके ते शांततावादी व्यक्तींना भीत नाहीत. क्रोधी
मनुष्य जितका तीव्रगतीने आपले कार्य करून घेतो तितक्या वेळांत शांतिक्षमाशील मनुष्य आपले कार्य
साध्य करून घेऊ शकत नाही. तसेच *' हा क्रोधी आहे '* असे कळतांच त्यांचे काम शांतिक्षमाशील व्यक्तींना
बाजूस करून प्रथम केले जाते, हा व्यवहार सर्वांना माहीत आहे. क्रोधामध्ये अशीच कोणतीतरी शक्ती आहे.
क्रोध हा संकटातून त्वरीत बचाव करणारा शीघ्र-संरक्षक आहे. त्वरीत शीघ्र प्रतिकार करणारी क्रोध ही महान
शक्ती आहे. क्रोधच दृष्ट निर्दालक व धर्मसंरक्षक परमात्म्याचा अंश आहे. देवदेवतांच्या सर्व अवतारांत त्यांनी
क्रोधाच्या द्वारेंच दुष्टनिर्दालन व सज्जनरक्षण केले आहे. क्रोध ही पवित्र मनुष्याची तेजस्विता आहे.
पात्र पाहून दान करावे ह्याचप्रमाणे मनुष्य पाहुनच क्षमा करावी. अन्यथा तो दुष्ट संधी मिळताच आपल्या व
इतरांच्या मृत्यूस कारण होतो. विषवल्ली मुळापासून उखडून टाकून तिचा नाश केल्यानेंच आपले व
समाजाच्या जिवीताचे रक्षण होईल. दृष्टावर क्षमा करणे हा क्षमेचा अतिरेक किंवा दुरुपयोगच होय. भारतांतील
सोमनाथादी मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांति, क्षमा यांच्या अतिरेकाचेच दुष्परिणाम व्यक्त करतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img