Literature

आषाढ शुद्ध दशमी

मीपणाच्या जाणीवेस रूप नसते. ती जाणीव अव्यक्त असली तरी स्फूरणरूपानेच व्यक्त होत असते. मीपणाची जाणीवही यामुळेच होते. हीच महत्वाची जाणीव होय. म्हणून या रूपास ‘हिरण्यगर्भ’ असे संबोधून वेदामध्ये त्या संबंधात ‘भुतस्य जातः पतिरेकऽआसीत्’ असे म्हटले आहे.

गाढ झोपेमध्ये मीपणाची जाणीव असून नसल्यासारखी आहे. त्याचप्रमाणे ब्रम्हांडास कारण असलेले देहरूपही अव्यक्त स्वरूपांत व्यक्त होते. ‘अहं ब्रम्हाऽस्मि’ यांत सुद्धा व्यक्तरूप आढळून येत नाही. बुद्धी ही अगोचर व अनुभवजन्य आहे तशीच स्वसंवेद्यही आहे. अव्यक्त असलेले ज्ञानस्वरूप, हिरण्यगर्भामुळेच मीपणाच्या जाणिवेने व्यक्त झाले आहे. त्या मीपणाच्या स्फूर्तीमुळेच सर्व गुरूसंप्रदाय चालत आले आहेत, ब्रम्हा, विष्णू, महेश आदी सर्वांच्या मीपणाच्या जाणीवेस हिरण्यगर्भच कारणीभूत होय. म्हणजे आदिनारायणच. हे ज्ञान तीन मुखांनी त्रिमुर्तीरूप झाले आहे.

अष्टदिक्पाल ज्ञानीच होते. कठोपनिषदांत यमधर्माने नचिकेतास ज्ञानोपदेश केला आहे तर छांदोग्योपनिषदांत ब्रम्हदेवाने इंद्रास ज्ञान सांगितले आहे. यावरून हे सर्व गुरूच होत. त्याबद्दल शंका घेण्याचे कारणच रहात नाही. मानवामध्येही असंख्य व्यक्तींनी आजपावेतो गुरूपदाची प्राप्ती केली असल्याचे आपणा सर्वांना माहित आहेच.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img