Literature

आषाढ शुद्ध द्वितीया

गुरूतत्त्व अति गहन आहे असे श्रुति-स्मृती सांगतात. आपल्या दासबोध ग्रंथातील पहिल्या दशकातील ‘गुरूस्तवन’ या समासाच्या सुरवातीस श्रीसमर्थ ‘श्रीगुरूस्तवन करण्यास माझी मति कुंठित झाली आहे’ असे म्हणूनच सद्गुरूस्तवनास सिद्ध झाले परंतु ते वर्णन करणे शक्य नाही असे जेव्हा त्यांच्या ध्यानांत आले त्यावेळी ते स्तब्ध झाले, कारण त्या स्वरूपांत माया निर्माण न झाल्याने त्यांत जग दिसल नाहीे. मन,वाचा यांचाही पत्ता लागला नाही. अशा या गुरूस्वरूपाचे वर्णन कसे करावयाचे? मनास ते अगम्य आहे. वाचाही कुंठित झाली. या साधनाद्वारे दिसणारे जगच फक्त वर्णिता येईल. पण हे जग नाशीवंत आहे. गुरूपद मात्र शाश्वत आहे. अशा शाश्वतांचे अशाश्वत अशा दृष्टांतानी वर्णन करणे कसे शक्य आहे?

उपाधी कोणाला नाही? हरी, हर, ब्रम्हा यांच्या मागेही उपाधी आहेत. सत्वगुणाभिमानी विष्णू जगाचा पालनकर्ता व तेंच त्याचे काम. ब्रम्हा रजोगुणाभिमानी म्हणून उत्पत्ती हेच त्याचे काम आणि उत्पन्न झालेल्याचा नाश करणे हेंच तमोगुणी शिवाचे काम होय. एकंदरीत या जगाचे आद्यन्तनिर्बहन ही ह्या तिघांची निरनिराळी कामें होत. पण जग असेल तो पर्यंतच त्यांचे अधिकार आहेत. जग नसेल तर त्यांचे अधिकारही नसणार. मग अशा वेळी ब्रम्हा, विष्णू, महेश असे कोणास म्हणावे?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img