Literature

ऋणत्रय

ब्रह्मचर्येण ऋषिभ्यो यज्ञेन देवेभ्यः प्रजया पितृभ्यः एष वा अनृणः । ( तै. संहिता ) 

ब्रह्मचर्याश्रमांत राहून वेदशास्त्राध्ययनाने अथवा वेदाच्या अन्धिकाऱ्यांना वैदिक मताच्या प्राध्ययनानें ऋषिऋणांतून, आपापल्या अधिकारा नुसार श्रुतिस्मृतिपुराणोक्त यज्ञादि निष्काम कर्माने देवऋणांतुन, कर्तव्य म्हणून केलेल्या अकाम प्रजोत्पादनानें पितृऋणांतून प्रवृत्तिवासनेचा मनुष्य मुक्त होतो. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । (तै. शिष्य) देवपितृकार्ये सोडूं नको म्हणून पुत्राला सांगितले आहे. या पुनर्विवाहानें या वाक्यांना कोणता अर्थ राहणार ! वांटणीच्या दृष्टीने सुद्धां कुणाची ती मुले ठरतील कोण्या एकाची म्हणून कोणती इस्टेट शिल्लक राहील वाट्यांचा प्रश्नच राहात नाही. देवपितृ कार्याचा अधिकार औरस पुत्राला असल्यामुळे वंशान्वय, कुलधर्म, कुलाचार, देवपितृकार्य वंशपरंपरेनें आपल्या कुलांतल्यांनी चालवीत असावे म्हणून वाड वडिलांनी घर करून, श्रमांनी संपत्ति मिळवून ती मुलाला द्यावयाची असा वैदिक धर्मशास्त्राचा कायदा आहे. मुली परगोत्राला दिल्या जात असल्यामुळे तिला वांट्याचा हक्क नाहीं असे श्रुतिस्मृतींनी सांगितले आहे. उत्तरक्रिया, वंश वृद्धि, कुलधर्म, कुलाचार चालविणाऱ्या संततीला दिल्याप्रमाणे स्त्री संततीला वांटणी दिली तर काम करणाऱ्याला व न करणाऱ्याला एकच वेतन दिल्या प्रमाणे होईल. या दृष्टीने तस्मा स्त्रियः निरिंद्रिया अदायादीः । स्त्रिया वांट्याच्या अधिकारी होऊं शकत नाहीत असे श्रुतीचे सांगणे आहे. पुरुष संततीनेच वंश वाढतो. गरीब कुटुंबांतील स्त्री संततिला वडिलार्जित संपतचा वाटा दिल्यास पितरांच्या उत्तरक्रियेसहि पुरेसें द्रव्य एकेकापाशी राहाणार नाहीं, पुढील धर्मकार्य करणे कठीण जाईल व अशा रीतीने देवपितृकार्ये अजिबात नष्ट होतील व आर्य संस्कृतीचे रूप राहणार नाही. वास्तविक स्वराज्य म्हणजे स्वधर्माचरणाची अनुकूलता असाच अर्थ आहे, हे विचाराअंतीं कोणालाहि पटेल.

सहृदयी आर्य धर्माला स्त्री संततीचे दारिद्य कसे बरें पाहवेल त्यांच्या दारिद्र्यपरिहारार्थ त्यांचे मातापिता, बंधु हे प्रयत्न करतीलच आणि ते त्यांनी अवश्य करावे. तशा प्रसंगी त्यांची ऐपत पाहून मातापितरांकडून अथवा बंधु वर्गांकडून त्या स्त्री संततीच्या रक्षणार्थ जीवनाकरितां पुरेसे सरकाराने अवश्य देववावे म्हणजे श्रीमंत कुलांतल्या स्त्री संततीची कुठे कुठे दिसून येणारी दैना नष्ट होईल.

सकृदंशो निपतति सकृत्कन्या प्रदीयते । सकृदाह ददानीति त्रिण्येतानि सतां सकृत् ॥ (मनु. ९-४७)

–आर्य धर्माप्रमाणें पितृधनाचा विभाग, कन्यादान आणि वचन है एकेकदांच दिलें जातें. विवाहाला ‘कन्यादान’ म्हणतात. ‘तुला माझी कन्या देतों ‘म्हणून सांगून वाडनिश्चय करून वचन सत्य करण्यास त्या बरास आपली कन्या शास्त्रोक्त प्रकारें देणें व आपलें दिलेलें वचन असत्य होऊ नये म्हणून पुन्हां तिचा अन्याशी विवाह करून न देणें असा ‘कन्यादान’ या शब्दाचा अर्थ होतो. पुनर्विवाहाच्या पद्धतीनें दिलेलें वचन मोडण्याचा म्हणजे असत्य भाषण करण्याचा अभ्यास प्रजेला घालून दिल्याप्रमाणें होतें. न भवति पुनरुक्तं भाषितं सज्जनानाम् । – सज्जनांचे वचन बदलत नाही, या दृष्टीने दुर्जनाचे वचन बदलतें हैं सिद्ध होते. पुनर्विवाहानें जर वचनभंग होतो व वचनभंग झाल्यानें तो दुर्जन ठरतो तर पुनर्विवाहाच्या कायद्याने सरकार प्रजेला मुद्दाम दुर्जन करण्यास झटत आहे असे उघड प्रजा म्हणू लागल्यास त्याला सरकार काय उत्तर देईल ? वचनपालन म्हणजेच सत्य भाषण. सत्य भाषण नसल्यास कसलाच व्यवहार चालणार नाही. येतों, जातों, देतों, करतों या बचनांवर विश्वास ठेवूनच व्यवहार चालतो. हे सर्वच असत्य झाल्यास जगाचे जीवनच आटोपलें. सुरळीत जीवनव्यवहार चालण्यासहि वचन पाळण्याची, अथवा सत्य वचनाची आवश्यकता आहे म्हणून ‘सत्यं वद’ हा नियम वेदाने घालून दिला. यांत इहपर मानवांचे सुख आहे. यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः

अशीच वैदिक धर्माची व्याख्या आहे. वैदिक धर्माने व्यावहारिक तसे पारमार्थिक जीवनहि उत्कृष्टपणे साधतें व इतरांनाहि ते अनुकूल होते. कन्यादानाच्या वेळी आयतन जो संकल्प केला जातो तो पाहूं.

home-last-sec-img