Literature

करंटलक्षण

जनास मैत्री करीना कठीण शब्द बोले नाना । मूर्खपर्णे आवरेना । कोणीकासी ॥ १९ । ३ । १३. पवित्र लोकांमध्ये भिडावे । ( भीड बाळगतो, लाजतो ) ओंगळामध्ये निःशंक धावे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥ शब्द सांभाळून बोलेना। आरिता आवरेना । कोणीएकासी मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणीएकासी विश्वास नाहीं । कोणीएकाशीं सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥ राखाची बहुतांची अंतरें । भाग्य ये तदनंतरें । ऐशी हीं विवेकाची उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयं आपणास कळेना। शिकविले तें ऐकेन करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तो कांहींच नाहीं।अखंड पडिला संदेही । अनुमानाचे २० पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें काशानें । निश्चय नाहीं अनुमानें । वास केला ||२१कांही एक पुरतें कळेना । सभेमध्ये बोलों राहेना। बाष्कळ लावाड ऐसें जना । कळों आलें ॥ २२ ॥ कांही नेमकपण आपुलें। बहुत जनासी कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य झालें । भूमंडळीं २३झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे की फुकाची जिकडे तिकडे होती ची ची । अवलक्षणे ॥ २४ ॥ भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणें ॥ २५ ॥ लोकांसीं बरें करावें। तें उसणें सवेंचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें। जाणिजेना ॥ २६ ॥ या कारणें अवगुण त्यागावे। उत्तम गुण समजोन घ्यावे । तेणें मनासारखे फावे। सकळ कांहीं ॥३०॥

सत्त्वेतराभ्यां धर्माधर्मनिर्णयः’ या आधाराने सत्त्वगुणात्मकच धर्म म्हणवून घेतो. या दृष्टीनें द्वितीय दशकाच्या ७ व्या समासांतलें सत्वगुणाचे वर्णनसुद्धां धर्म आणि धार्मिकाचा आदर्श दर्शवितें. प्रत्येकानेच हा सत्त्वगुण वाढविला पाहिजे. सत्त्वगुणाचे महत्त्व वर्णितांना श्रीसमर्थ म्हणतात :

जो भजनाचा आधार जो योगीयांची थार। जो निरसी संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥ जेणें होये उत्तम गती मार्ग फुटे भगवंती । जेणे पाविजे मुक्ती । सायोज्यता ते ॥ ३ ॥ जो भक्तांचा कोंबसा। जो भवार्ण वींचा भर्वसा । मोक्षलक्ष्मीची दशा । तो सत्त्वगुण ॥ ४ ॥ जो परमार्थाचे मंडण । जो महंतांचे भूषण रजतमांचे निरशन । जयाचेनी ॥ ५ ॥ जो परम सुखकारी । जो आनंदाची लहरी  देऊनिया निवारी जन्म मृत्य ॥ ६ ॥ जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचे मूळ पीठ । जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥

धर्ममूर्ति श्रीरामाच्या स्वाभाविकपणे आंगवळणी पडलेल्या धर्मा चरणाचीच ओळख या सत्त्वगुणांच्या वर्णनानें पटते. पुढची ओवी पाहा.  ऐसा हा सत्वगुण । देही उमटतां आपण । तये क्रियेचे लक्षण । ऐसे असे ८त्याच्यापुढे सारी धर्मपुरुषाची लक्षणे आली आहेत. संबंध समासच मननीय आहे. त्यांतून कांहीं ओव्या मात्र येथे करतों 

ईश्वरी प्रेमा अधिक । प्रपंच संपादणें लौकिक । सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ।। ५ ।। शब्द कठीण न बोले । अति नेमेसी चाले। योगी जेणे तोपविले । तो सत्वगुण ॥ ३७ बळदेहाभिमान गळे विषयों वैराग्य सत्वगुण प्रबळे । मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्चगुण ॥ ४२ ॥ असता आपले आश्रमी । अत्यादरें नित्य नेमीं । सदा प्रीति लागे रामी । तो ॥ ४५ ॥ शांति क्षमा आणि दया। (आत्म) निश्चय उपजे जया। सत्वगुण जाणाबा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥ आले अतीत अभ्या गत । जाऊं नेदी तो भुकिस्त । यथानुशक्ति दान देत । तो सत्त्वगुण ॥ ५३ ॥ सकळांसी नम्र बोले । मर्यादा धरून चाले । सर्व जन तोषविले  तो सत्वगुण ॥ ६३ ॥ सकळ जनासी आर्जव । नाहीं विरोधास ठाब । परोपकारी वेंची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥ आपकार्याहून जीवीं  परकार्य सिद्धी करावी । मरोन कीर्ती उरवावी । तो सत्वगुण ६५पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रा ऐसी सांठवण तो सत्वगुण ॥ ६६ ॥ नांच उत्तर साहणे प्रत्युत्तर (कांहीं) न देणें । आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ।। ६७ । सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना  ज्ञान सिकवी अज्ञाना तो सत्वगुण ॥ ७९ ॥ परभूषणे भूषण । परदूषणे दूषण परदुःखें शिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥ आतां असो हें बहुत । देवीं धर्मी ज्याचे चित्त । भजे कामना रहित । तो सत्वगुण ॥ ८५ ।।

श्रीरामाच्या जीवन-चरित्राला आदर्श मानणाऱ्याच्या हीं सारी लक्षणे आपोआप आंगवळणी पडतात  हें दर्शविण्याकरितांच सदा प्रीति लागे राम’ अशा पदाची श्रीसमर्थांनी जोडणी केली आहे असे वाटते. सनातन धर्माचें आर्य संस्कृतीचें व त्याच्या आदर्श पुरुषाचे यांतून दर्शन होते. याच्या पुढच्या समासांत म्हणजे दुसऱ्या दशकाच्या ८ व्या समासांत सद्विद्येची लक्षणे दिली आहेत. या समासाचा आरंभ असा आहे. ऐका सद्विद्येच लक्षणें । परमशुद्ध सुलक्षणें । विचार घेतां बळेंचि वाण। सद्विद्या आंगीं ॥ हें असें सर्व देण्यांत श्री समर्थांचा ही लक्षणे सर्वांच्या आंगीं बाणावत हा हेतु येथें स्पष्ट होतो.

सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तम लक्षणीं विशेष । त्याचे गुण ऐकत संतोष । परम वाटे ॥ २ ॥ ही संबंध ओवी श्रीरामाला लागू पडत नाही. असे कोणाला वाटेल भाविक सात्विक प्रेमळ । शांती क्षमा दयाशीळ । लीन तत्पर केवळ। अमृतवचनी ॥ ३ ॥ परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर । परम संपन्न आणि उदार । आतिशयेंसी ॥ ४ ॥ परम ज्ञाता आणि भक्त । महापंडित आणि विरक्त । महा तपस्त्री आणि शांत । आतिशयेंसी ॥ ५ ॥ वक्ता आणि नैराशता । सर्वज्ञ आणि सादरता । श्रेष्ठ आणि नम्रता । सर्वत्रांसी ॥ ६ ॥ राजा आणि धार्मिक । शूर आणि विवेक । तारुण्य आणि नेमक । आतिशयेंसी ॥ ७ ॥॥ साधु पवित्र पुण्यशीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ । कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥ सत्यवचनी शुभवचनी । कोमलवचनी येक वचनी । निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥ द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥ मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्ये परशोक हारी। सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरुषार्थे जगमित्र ॥ २१ ॥ सुखरूप संतोषरूप । आनंदरूप हास्यरूप । ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥ भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत । आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिति ॥ २६ ॥ यशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत । वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृति ॥ २७ ॥ विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्षणवंत । कुळवंत शुचिष्मंत बळवंत दयाळु ॥ २८ ॥ युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहु धारिष्ट । दीक्षावंत सदासंतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥

श्रीरामालाच डोळ्यापुढे ठेऊन श्रीसमर्थांनी या ओव्या लिहिल्या नाहीत असें कोण म्हणेल  यांत श्रीरामाच्या वर्णनाचाच हेतु नाहीं दुसराहि हेतु आहे. तो या पुढील ओबींत स्पष्ट होतो. असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्येचें लक्षण । अभ्यासाया निरूपण । अल्पमात्र बोलिलें ॥

पुढच्या ९ व्या समासांत विरक्तांची लक्षणे दिली आहेत. समाजांतील विरक्तांनी इकडे विशेष लक्ष द्यावें :

विरक्त विवेकें असावें । विरक्त अध्यात्म वाढवावें । विरक्त धारिष्ट धरावें । दमन विषयीं ७ विरक्त राखावें साधन । विरक्त लावावें भजन । विरक्त विशेष ब्रह्मज्ञान  प्रगटवावें ॥ ८॥ विरक्त सक्रिया प्रतिष्ठावी । विरक्त निवृत्ति विस्तारावी । विरक्त नैराशता धरावी । सदृढ जीवेंसी ॥ १० ॥ विरक्त धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी । विरक्तें क्षमा सांभा ळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥ विरक्त परमार्थ उजळावा । विरक्ते विचार शोधावा । विरक्त सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥ विरक्त भाविकें सांभाळावी । विरक्त प्रेमळे निचवावी । विरक्त साबडी नुपेक्षात्रीं । शरणागतें ॥ १३ ॥ विरक्त असावें परम दक्ष । विरक्त असावें अंतरसाक्ष। विरक्त बोढाया कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥ विरक्त अभ्यास करावा । विरक्त साक्षेप धरावा । विरक्त वक्तृत्वे उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥ विरक्त विमळ ज्ञान बोलावें। विरक्त वैराग्य स्तवीत जावे। विरक्त निश्रयाचें करावें। समाधान ॥ १६ ॥ बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्वार  पुण्यमार्गाचा विस्तार बळेचि करावा ॥ १९ ॥ स्नान संध्या जप ध्यान। तीर्थ यात्रा भगवद्भजन । नित्य नेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २०॥ हे केवळ विरक्तांकरितां झालें.

दृढ (आत्म) निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा । विश्वजन उद्धरावा । संसर्ग मानें ॥ २१ ॥

ही ओवी मात्र दोन्हीकडे झुकते. संसार म्हणजे सकल विश्व सुखरूप करून टाकावे असा अर्थ निस्पृहाकडे जातो. आत्मज्ञानसंपन्न होऊन दृढत्म निश्चयानें संसार केल्यास तो सुखाचा संसार होतो व तसा तो गृहस्थांनी करावा असा आशय गृहस्थाविषयीं व्यक्त होतो. बाकी अंतरस्थिति दोघांची सारखीच असावी लागते. निस्पृहांना बाह्य त्यागांतहि आघाडी मारतां येते आणि ती गृहस्थांच्या बाबतीत कांही प्रमाणांत लंगडी होते. द्वावेव वेदोक्तौ धर्मों प्रवृत्तिलक्षणश्च निवृत्तिलक्षणश्चेति  प्रवृत्ति-निवृत्ति लक्षणात्मक दोन वेदोक्त धर्म आहेत. दोन्हींचा आदर्श यांत दाखवून आर्यसंस्कृतींची घड येथे निदर्शनास आणून दिली आहे.

गणेश शारदा सद्गुरु  संत महंत मुनेश्वरु । सर्वहि माझा रघुवीर  सद्गुरुरूपें ॥ असे श्रीसमयानी श्रीरामाच्या बाबतीत उद्गारले आहे. पांचव्या दशवांतल्या प्रथम समासाच्या प्रारंभी जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा । परम पुरुषा आत्मयारामा  अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला नवचे ॥१॥ जें वेदांस सांकडें । जें शब्दासी कानडें । तें सच्छिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २ ॥ जें योगियांचे निजबर्म । जें शंकराचें निजधाम । विश्रांतीचे निजविश्राम परम गुह्य अगाध ॥ ३ ॥  अशा रीतीनें श्रीसमर्थांनी नमन केले आहे. श्रीसमर्थ श्रीमारुतीचा अवतार आणि मारुतीचे गुरु श्रीराम श्रीसमर्थांना श्रीरामाचाच अनुग्रह होता. श्रीरामांनी मारुतीला एकशेआठ उपनिषदांचा उपदेश केला हें मुक्तिकोपनिषदाच्या पुढील श्लोकावरू सिध्द होतें. भक्त्या शुश्रूषया रामं स्तुवन्पप्रच्छ मारुतिः । राम परमात्मासि सच्चिदानंदविग्रहः । इदानीं त्वां रघुश्रेष्ठ प्रणमामि मुहुर्मुहुः ॥ त्वद्रूप ज्ञातुमिच्छामि तत्त्वतो राम मुक्तये । अनायासेन ये नाई मुच्येयं भवबंधनात् । कृपया वद मे राम येन मुक्तो भवाम्यहम् । यावर श्रीरामाचें उत्तर : सांधु पृष्टं महाबाहो वदामि श्रृणु तत्त्वतः ॥ वेदान्त सुप्रतिष्ठोऽहं वेदान्तं समुपाश्रयम् । निश्वासभूता ये विष्णोर्वेदा जाता सुविस्तराः । तिलेषु तैलवद्वेदे वेदान्तः सुप्रतिष्ठितः ॥ आर्य संस्कृतींत गुरुशिष्याचाहि एक संबंध अतूट व अत्यंत महत्वाचा आहे. श्रीसमर्थांनी श्रीगुरुवर्णनाच्या मिशानेंहि आपल्या सद्गुरूचें अर्थात् श्रीरामरायाचेच वर्णन केले आहे. ब्रह्मज्ञानाकरितां स गुरुमेवाभिगच्छेत्। श्रीसद्गुरुलाच शरण गेलें पाहिजे असें मुंडकोपनिषदाच्या प्रथम मुंडकांत सांगितले आहे.  जैसे नेत्री घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । तेसें सद्गुरुवचनें ज्ञान । प्रकाश होये ॥३८॥ असें श्रीसमर्थांचेंहि म्हणणे आहे.

home-last-sec-img