Literature

कर्मानुरूप फलप्राप्ति

– जगांतील मानव समाजांत कांहीं केवळ विरक्त तर कांहीं केवळ विषयी, कांहीं शुद्ध नीतिमंत तर कांहीं शुद्ध नीतिभ्रष्ट, कांहीं अति शांत त कांहीं अति कोपी, कांहीं श्रीमान् कांहीं दरिद्री, याचप्रमाणें कांहीं पुण्यवंत कांहीं पापिष्ट, कांहीं बुद्धिमान कांहीं मंद, कांहीं उद्योगी कांहीं आळशी, याहू वेगळे कांहीं मध्यम वर्गाचे अशी विषमता व वैचित्र्य दिसून येतें. संस्कार वासना, कर्म, संग-सहवास यांच्या विभिन्नतेनें जशी इथल्या जीवनां विभिन्नता दिसून येते, तशी मरणोत्तर प्राप्त होणाऱ्या स्थितींतहि विभिन्न स्वाभाविकच असणार. आपआपल्या कर्माचे स्मरण मरणोत्तर राहात नसल्या त्या त्या जीवाला या या कर्माचें हें फळ म्हणून तें समजून देण्याकरितां कोणी न आलें तरी सर्वज्ञ परमात्मा त्या त्या कर्माप्रमाणें तें तें फळ त्या त्या जीवाला देत असतो. अखिल राज्याचा राजा जरी अधिपति असला तरी त्या त्या खात्याची भिन्न भिन्न विषय-विभागांची व्यवस्था वेगवेगळ्यांना देऊन निरनिराळे अधिकारी वर्ग तो निर्माण करतो. ती सर्व सत्ता एका राजांतच एकवटलेली असते. त्याप्रमाणेच या सर्व जगांचा जरी परमात्मा हा अविपति असला तरी तो त्या त्या विषय-विभागाची व्यवस्था वेगवेगळ्यांना देऊन निरनिराळे अधिकारीवर्ग निर्माण करतो. निरनिराळ्या विषय विभागांची जबाबदारी त्यांच्यावर असते. या परमात्म्याकडून नियुक्त झालेले ते ते भिन्न भिन्न अधिकारी या राज्यांत आपआपले कर्तव्य निमूटपणे पार पाडीत असतात. या सर्वांवर देखरेख करण्याचा अधिकार मात्र परमात्म्याचाच आहे, यांत संशय नाहीं.

home-last-sec-img