Literature

कामजयासाठी उपाय

अलीकडच्या काळांत चांगला आदर्श नाही, तसें शिक्षण नाही आणि आईबापांचे लहानपणापासून तसे तीव्र वळण नाहीं. हे सर्व काही काही ठिकाणी असूनहि वेळी मन आवरून धरण्याचे धैये नि सामर्थ्य नाहीं. एकदां काळया यादीमध्ये नांव गेले म्हणजे पुढे सुधारला तरी तो ठपका त्याच्या जीवनभर असतोच. जीवनाचीच वाजी आहे. एकदां हरलें म्हणजे गेलें. जरी एखादे वेळी काळवेरे गुप्त राहिले तरी त्याचे मन त्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही.

गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यमादौ । परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन || अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्तेः । भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः ॥ (भर्तृहरि नी. श. ९९)

शहाण्या मनुष्याने कांहींहि करावयाचे झाल्यास तें प्रारंभी चांगले अथवा वाईट कसेंहि दिसो, त्याच्या परिणामाचा चांगला विचार करून मग त्यांत पडावें. विकारवश होऊन अथवा विचार न करता एकदम केल्या गेलेल्या कर्माचा परिणाम अस्तनीतल्या निखाऱ्याप्रमाणे आंतल्या आंतच दाहक, चंद्राप्रमाणे जीवनालाच कलंक आणणारा आणि मरेपर्यंत हृदयांत रुतलेल्या वाणासारखा सलणारा होतो. सर्वच मानवजात भाऊबहिणीप्रमाणे स्वेतर स्त्रियांशी शील सांभाळून राहिलेली बघण्याचे भाग्य मला लौकरच येवो, म्हणून मी ईशचरणी प्रार्थना करीत आहे.

कामाचें वळलें शरीर ।‘ तें असेपर्यंत म्हणजे देहाभिमान असेपर्यंत अगदी सामान्यांना काम असणारच. यासंबंधी ‘भोज- प्रबंधांत एक मोठी मार्मिक गोष्ट आलेली आहे : भोजराजाने एका रात्री एक अति वृद्ध सतिपतीचे जोडपें पाहिले. राजाने दुसऱ्या दिवशी त्या वृद्ध जोडप्याला बोलावणे पाठविलें. राजाचे बोलावणे कशासाठी आले आहे, हे त्या जोडप्याच्या लक्षांत आले.

त्या वृद्ध जोडप्याने राजासमोर जातांच त्याच्यापुढे दोन पुडया ठेवल्या. राजानें पुड्या सोडून पाहिल्या तो एकीत तांदुळाचा एक दाणा आणि दुसरीत चिमूटभर राख असलेली आढळून आली. राजाने साहजिकच विचारले की, हे तुम्हीं काय आणले आहे ? त्या जोडप्याने उत्तर दिले, ‘राजा, पुरुषाच्या पोटांत अन्नाचा एक दाणा असेपर्यंत आणि स्त्रीच्या देहाची जळून राख होईपर्यंत दोघांनाहि काम सुटत नाहीं, एवढाच या पुड्यांतल्या वस्तूंचा अर्थ आहे.

कोणत्याहि प्रश्नाला दोन बाजू असतातच; तेव्हां प्रत्येक गोष्ट साधकबाधक प्रमाणांनिशी आपल्याला समजून घेतली पाहिजे. निसर्ग काय आहे, आम्हाला त्यातून आपल्या उद्धारा– करितां कसें वागले पाहिजे, साधावयाचें काय आहे, जग आपल्या सत्यरूपानें कसें आहे, औपाधिकरूपानें कसें आहे, कोणत्या जातीच्या प्राण्याबरोबर त्याचे गुणधर्म ओळखून आपल्याला त्याच्यापासून इजा न होऊं देतां, कसें वागले पाहिजे, त्याचे गुण धर्म काय, या सर्वांचा विचार करावयास पाहिजे. काही ग्रंथांच्या साहाय्यानें, कांही दुसऱ्यास विचारून, काही पाहून, तितके अपा याचे नसलेले स्थालीपुलाकन्यायाने शितावरून भाताची परीक्षाया म्हणीप्रमाणे काही अनुभवून शहाणे व्हावयाचे असते. येक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोड्या अनुभवें । बहुत जाणावें।‘ (दा. १३-६-७) देहाभिमान असेपर्यंत कामाचा प्रवेश होतो, हे ओळखून रजरेताच्या देहाला मी म्हणून मानण्याचे टाकून दिलें की कामाचा त्याग आपोआप होतोच. देहाला मी म्हणण्याचे एकदा नाहीसे झाले की, कोणी आपल्याला स्त्री

म्हणूनहि मानणार नाही आणि पुरुष म्हणूनहि मानणार नाही. स्त्री-पुरुषांची भावनाच नष्ट झाल्यानंतर स्त्री-पुरुष अशा भावना तून दडत असलेला कामहि त्याच्याबरोबरच नष्ट होतो. मी पुरुष देह नव्हे, मी स्त्री देह नव्हे, असें अनुभवास आल्यानंतर कोणालाही कोणाची इच्छा काय म्हणून होईल ? तेव्हा देहाभिमानाचा त्याग हा कामजयाचा मुख्य उपाय आहे. त्याचा समूळ सबीज त्याग म्हणजेच मोक्षमार्गाची प्राप्ति हें प्रत्येकानेंच जाणावयाला पाहिजे मोक्षाकरितांच सर्वस्वाचा त्याग केलेल्या निःस्पृहांतून तर याचा निश्चय असावयालाच पाहिजे. आपलाच उद्धार आपल्याला करा वयाचा आहे. आपल्या हिताकरिता म्हणून शत्रुतुल्य असणाऱ्या देहाभिमानाला, इंद्रियमनाला आणि कामाला जिंकावयास पाहिजेच.

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ।। ( भ.गी. ३-४३) मी या स्फुरणाच्या पूर्वीचेंच निर्विकल्प, कोणतेंहि स्फुरणरहित तुझें एक आनंदघनरूप आहे असे जाणून अखंड स्वरूपांत राहून कसलीह स्फूर्ति उठू न देतां या कामरूप शत्रूला, जो देहाभिमान्यांना अजिंक्य वाटतो त्याला, तू जिंक. भगवंताने सर्व मोक्षसाधकांना हे सांगितले आहे. त्यांतूनहि जिंकण्याच्या उद्देशानेच घरांतून कूच करून निघालेल्या निःस्पृह वीराला तर मुद्दाम सांगावे म्हणून कामजयाची ही युक्ति भगवंतांनी सांगितली.

home-last-sec-img