Literature

कार्तिक वद्य अष्टमी

परमात्मा शाश्वतसुअसःुअख स्वरूप आहे. यामुळे आपणास निर्माण करणाऱ्या त्या परमात्म्याची प्राप्ती होईपर्यंत आपल्यास शाश्वत सुख प्राप्त होणे शक्य नाही. खरे शाश्वतसुख परमात्म्याशिवाय प्राप्त होत नाही. खऱ्या सुखाची प्राप्ती होणे म्हणजेच परमात्मस्वरूपाची प्राप्ती होय. पण हे भिन्नतेने प्राप्त होणार की अभिन्नतेने ? ते भिन्नतेने प्राप्त करून घेणे शक्य आहे असे म्हटले तर परमात्म्याशिवाय सर्व दुःखरूपच असल्याने दुःखाने सुख प्राप्त केले असे होईल. पण हे तर तर्कविरूध्द आहे. परमात्म्यापासून सुखप्राप्ती करून घेणे हे त्याच्याठायी असलेल्या ऐकबुध्दीनेच !

दुःखनिवृत्तीसाठी संसारसुखरूपी भ्रम सोडून आपल्या मनात परमात्म्याच्या स्वरूपाची जास्तीत जास्त धारणा होण्याकरता धर्मनियमांचे पालन आवश्यक आहे. असत्य, अशाश्वत सुखासाठी केलेले साधन योग्य नाही. सत्यसुखप्राप्तीसाठी केली जाणारी साधनाच महत्त्वाची होय. अशी साधना नरजन्मासाठी योग्य असून ती साधना करूनच आपले पूर्वज मुक्त होऊ शकले. तुम्ही त्यांचे अमृतपुत्र आहात. आपल्या पूर्वजांनी केलेली साधना करून तुम्ही पण धन्य व्हा !!!

विश्वजनाची संपूर्ण साधना म्हणजेच शाश्वत सुखप्राप्ती असून या विश्वाला सुखरूपी प्रकाश देणाऱ्या परमात्म्याच्या विविधरूपांचे ज्ञान व त्यांचे रहस्य सनातन धर्मातच आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img