Literature

कार्तिक वद्य चतुर्थी

कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीपैकी कर्म हे तात्पुरत्या सुखाकरता आहे व वेदामध्येही तसाच उल्लेख आहे. यज्ञाने देव संतुष्ट होतात. त्याच्या कृपेने पाऊस पडतो आणि त्यामुळे पशु, धान्य इत्यादींचे उत्पादन व पोषण होते. वर्णाश्रमांत सांगितलेल्या कर्मांनी सुस्थिती प्राप्त करून देवतांना संतुष्ट करणे हा समंजसपणाचा मार्ग होय. याशिवाय जनसामान्यांचे जीवन व्यवहारामध्ये सुगम, सरळ व प्रगतीपर असले पाहिजे हाही उद्देश यामध्ये आहे.

या चराचर विश्वाचा निर्माता असलेल्या विश्वसम्राटाने निरनिराळ्या सृष्टिक्रियेसाठी निरनिराळा अधिकारीवर्ग निर्माण केला आहे. राजाची भेट घेण्यापूर्वी त्याच्या हुजऱ्यास खुश करावे लागते. तसेच परमात्म्याच्या भेटीपूर्वी निरनिराळ्या देवता तृप्त कराव्या लागतात. त्यामुळे व्यवहारी जीवनांतही सुख मिळते व आपले आणि इतरांचेही कल्याण होते. म्हणूनच स्व-परहित साधण्यासाठी कर्ममार्गाचे आचरण केले पाहिजे. त्यानेच आपले जीवन धर्ममय होईल. कर्म केल्याशिवाय कोणीही जगणे शक्य नाही.
*’ नहि कश्चित् क्षणमपि जातु त्तिष्ठत्यकर्मकृत् |’* ( भ.गी. ) असे असल्यामुळे कर्म करणे अनिवार्य आहे. म्हणून चांगल्या उद्देशाने कर्म करून त्याचे योग्यरितीने पालन केल्याने त्या कर्मामुळे परमात्मा तृप्त होईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img