Literature

कार्तिक वद्य त्रयोदशी

हास्यापद अशा जीवनांतून मुक्त झालेला मनुष्य पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या सिंहासारखे उदात्त जीवन जगू शकतो व तो शास्त्र, धर्म व संस्कृती यांना उजाळा देऊन चिरसुखासाठी प्रयत्नशील असतो. तापत्रयाने किंवा विषयलालसेने जे सुख मलीन किंवा कमी होत नाही, निसर्गबंधनाच्या योगाने संकुचित होत नाही असे पवित्र विशाल सुख हेच त्याचे लक्षण असते. अशा पराकोटीच्या शाश्वत सुखासाठी ( Maximum Happiness ) मानवाने प्रयत्नशील असले पाहिजे. तेच मानवजन्मास योग्य असून तेच त्यांचे ध्येय असावयास हवे, त्यामुळे इहलोकी मानवाची योग्यता वाढून उत्कृष्ट साधनांनी पुढे पुढे जाऊन तो प्रभावी पुरूष होईल. अशा मनुष्याच्या योग्यतेचे वर्णन सर्व शास्त्रांनी उत्तम प्रकारे केले आहे.

*’पृथ्वी तस्य प्रभावात् वहति दिनमिशं यौवने योगि शान्तम्’*

यौवनामध्येच शांत झालेला योगी दिव्यपदाप्रत जाऊन पोहोचतो, त्याची महिमा अवर्णनीय असते. त्याच्या प्रभावाने जग चालू शकते व त्याच्याच योगाने जगाचा उध्दार होईल असे श्रुतिवचन आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img