Literature

कार्तिक वद्य नवमी

प्रत्येक जीव आपापल्या सर्वशक्तीनिशी जगण्यासाठीच प्रयत्न करीत असतो असे आपण पाहतो. एखाद्या मनुष्यास ‘ तूं चांगल्या रितीने जगावे म्हणून उत्तम राजोचित अनुकूल असे वातावरण आम्ही तयार करून देऊ. पण तूं आणखी कोणतीच आशा न बाळगता, कोणताही निराळा उद्योग करूं नकोस ‘ असे जर सांगितले तर तो त्यास होकार देईल काय ? अर्थात या प्रश्नास ‘ नाही ‘ हेच उत्तर मिळणार ! पशु, पक्षी, कृमी, किटक यांनाही वरीलप्रमाणे सांगितले तर तो त्यास सम्मति देतील काय ? कारण त्यास सम्मति देणे आत्मवचनाचे व ते तर्कदृष्टही होईल. एखाद्या प्राण्यास किंवा मनुष्यास त्याच्या इच्छेनुरूप असे प्राप्त न झाल्यास त्यास अत्यंतिक नैराश्य येईल. अशा परिस्थितीत त्याला निर्बंधात ठेवल्यास त्यास जीवनाबद्दल अनास्था वाटू लागुन जगण्याची इच्छा नाहीशी होईल व त्यास लवकर मृत्यू प्राप्त होईल ; अशी कितीतरी उदाहरणे आपण आपल्या सभोवार पाहिली असतील. अशा घटना आपण सुक्ष्मदृष्टीने पाहिल्या तर आपणास पुढील गोष्ट आढळून येईल.

जीवनाचा उद्देश केवळ जगणे हा नसून त्यापेक्षाही महत्त्वाचा असा उद्देश असला पाहिजे. मग तो कोणता ? याचा विचार केल्यास ‘ जीवनमुक्तीची अभिलाषा ‘ हाच उद्देश असला पाहिजे असेच आढळून येईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img