Literature

गुणधर्माप्रमाणे कर्तव्य व कार्यक्षेत्र

स्त्रीपुरुषांना त्या त्या पुल्लिंगी, स्त्रीलिंगी नांवानींच हांक मारावी लागते. त्या त्या नात्यांनी त्या त्या व्यक्तीशीं व्यवहार करावा लागतो. प्रत्येकाची पात्रता भिन्न भिन्न असते. पात्रतेप्रमाणे अधिकार दिला जातो. अधिकाराप्रमाणे जबाब दारी असते. जबाबदारीप्रमाणे कर्तव्य वेगळे वेगळे असते. त्या त्या कर्तव्या प्रमाणे त्याचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असते. त्या त्या कार्यक्षेत्रांत त्याला त्याला त्या कर्तव्यपूर्तीला अनुरूप असे. तसे तसे आचार विचार पाळावे लागतात.. स्वपरहिताची दृष्टि ठेवून प्रत्येकानें वागले पाहिजे व सर्वत्र आत्मदृष्टि ठेवली पाहिजे. असे असले तरी जगांतल्या पदार्थांची, जातींची, गुणधर्मांची भिन्नता व विविधता घालविता येत नाही व घालवून व्यवहार चालतहि नाही. एकमेच मैदाची अनेक रूपें बुध्या धारण केली असल्यामुळे त्यांत विषमता नाही, निर्दयता नाही, सत्यदृष्टीने भेद नाही व व्यावहारिक दृष्टीनें अभेद नाही. इथल्या जाती, भेद, मित्रता, विविधता जशाच्या तशाच ठेवून त्यांचा व्यावहारिक जीवनास उपयोग करून घ्यावा व पारमार्थिक एकत्वानें समत्व बाळगावें. अभेदांत भेद, भेदांत अभेद, अनेकांत एकत्व व एकांत अनेकत्य अशा बिलक्षण अनुभवांनीं बर्तण्याचें असे कांहीं एक हे ऐहिक जीवन आहे. एकानेंच आपल्या रूपांत आधार, आधेय, आश्रय, आश्रयी, मुख्य, गौण, कार्यकारण, नचि, उच्च, असे भिन्न भाव आणि विविधता निर्माण करून तोच एक तसा वागतो. या दृष्टीनेच भेद आणि विविधता कायम ठेवून समता बाळगावी लागते. अशीच ही व्यवहाराची व परमार्थाची तात्विक दृष्टि आहे. सृष्टिनियमांची पायमली कोण व कोणता समाज करूं शकेल ? हें सर्व जाणून वागले म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, हरिजनोद्धाराच्या प्रचाराचा सक्त कायदा, स्त्री स्वातंत्र्य इत्यादि प्रश्न प्रजा सरकार दोघांच्या ठिकाणीहि उद्भवणार नाहीत. परस्परांतले भेद कायम राहून देखील परस्परांशी परस्परांचे गोड आचरण, प्रेमाची वागणूक, आत्मीय भावनेचे साहाय्य, मृदु मधुर भाषण, इहपर श्रेष्ठ सुखाची खोल व दीर्घ दृष्टि इत्यादि समाजांत सर्वत्र दिसून येईल व सर्वांचेच सुखासमाधानाचे दिव्य जविन होईल. कोठेहि अशांतता, क्षुब्धता, दंगेधोपे, अत्याचार इत्यादि अविवेकाच्या कृत्यांचा मागमूसहि दिसून येणार नाहीं. रामराज्य अथवा आर्य संस्कृति, वैदिक पद्धति यांत असे एक आदर्श जीवन आपल्या उठावदारपणाने दाखवून घेत आहे.

एकेका पदार्थांत देवानें एकेक गुण ठेवला आहे. त्या त्या गुणाचा उपयोग आपल्या जीवनाला योग्य प्रकारें करून घेऊन जीवन चालवावयाचें असते. उंसांत गोड रस अधिक आहे. त्याचाच गुळासाखरेकरितां उपयोग केला तर थोडक्या श्रमांत अधिक लाभ करून घेता येतो. याच न्यायानें ईश्वरसृष्ट मनुष्य, पशुपक्षी व वनस्पति यांच्या भिन्न भिन्न जातींतून असणाऱ्या गुणांचा त्या त्या करितां उपयोग करून घेतल्यास थोड्या श्रमांत ती ती नड पुरी होऊन त्या त्या पासून अधिक लाभ होतो. ईशसृष्टीत गुळा साखरेकरितांच उत्पन्न झालेल्या उसाचा त्याकरितां उपयोग न करतां ज्या इतरांतून तो गुण नाहीं, त्या उसाच्या तोडीच्याच इतर वनस्पति करून त्यापासून गूळ आणि साखर गुणापेक्षा अधिक काढून दाखविण्याचा जर कुणी, इतर बनस्पतींच्या दयेनें, त्यांचा उद्धार म्हणून प्रयत्न करूं लागेल तर ऊंस पिकवावयाचें राहील, दुसऱ्यांतून हा गुणधर्म उत्पन्न करण्यास शक्य होणार नाहीं व इतर वनस्पति ऊंसहि न होतां आपलाहि गुणधमे घालवून निरुपयोगी बनतील.

देव-भक्त, गुरु-शिष्य, राजाश्रजा, स्वामी सेवक, सती-पति, पिता-पुत्र बरिष्ठ-कनिष्ठ, रयत-अधिकारी यांत आज्ञाकारी, आज्ञा-धारी असा परापरतेचा व्यवहार असावा लागतो.

शक्तीपेक्षां शक्तिमंताला अधिक महत्त्व असते. शक्ति अथवा प्रकृति ही परमात्मरूप पुरुषाच्या संकल्पाने झालेले त्याचे एक प्रतिरूप होय. शक्ति. शक्तिमंतांत आधार-आधैयान्चें नाते आहे. शक्तीला अथवा प्रकृतीला पुरुषाचाच आश्रय करावा लागतो. अशा रीतीने प्रकृतीचा अथवा शक्तीचा अंश असणाऱ्या सतीला पुरुषाचा अंश असणाऱ्या पतीचाच आश्रय करावा लागतो. अंश अंशीच्या अस्तित्वानें असतों. कार्यकारणभावाप्रमाणे कारण-रूप पुरुषाचा आश्रय कार्यरूप प्रकृतीला असावाच लागतो. कार्य कारणाच्या आश्रयाने असते. कार्य हें कारणांत लीन होते. त्याप्रमाणेच प्रकृतिहि पुरुषांत लीन होते. ‘शक्तिमानाची शक्ति या म्हणण्यांत शक्तिमानालाच प्राधान्य दिलें जाते. हीच दृष्टि अवलंबन स्त्रियांना स्वातंत्र्य नाहीं; तिने पुरुषाच्या आश्रयानेच राहावे असे म्हणण्यांत येते.

मोक्षप्राप्तीच्या सात भूमिकांचा विचार सप्तपदीत गर्भित ठेवून बहुत्वाच्या संकल्पानें स्थूलदेहधारी प्रकृतिपुरुष हे सतीपतीच्या रूपाने विवाहांत एक होतात आणि नंतर प्रजाकाम होऊन आपल्या ऐक्यत्वानें तद्योतक संततीद्वारां बहुल्याचा संकल्प पूर्ण करतात. कार्य शक्तीमुळेच होत असल्यामुळे शक्तिरूप असणाऱ्या धर्मपत्नीविना संततीरूप बहुत्व आणि त्याकरितां असणारा गृहस्था श्रम पूर्ण होत नाही. शक्तिमंतच शक्तीचे रूप धारण करीत असला तरी, शक्ति शक्तिमंत यांच्यांत अभेदत्व असले तरी, शक्ति ही शक्तिमंताचा आश्रय वरुनच असते, हैं सामान्यतः सर्वांनाहि कळून येण्यासारखे आहे. या दृष्टीने शक्तिरूप असणारी स्त्री पुरुषाच्या आधीच असावयाची हे तात्त्विक दृष्टीनेहि त्यांच्या त्यांच्या उपाधिस्वभावानुरूप सहज वाटते.

home-last-sec-img