प्रजाकामो ह वै प्रजापतिः । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा । स मिथुन उत्पादयते ॥ (प्रश्नो. १- ४ ) – प्रजाकाम प्रजापतीनें प्रजा निर्माण करावी म्हणून संकल्प केला. हेच त्याचें तप होय. अशा रीतीनें संकल्प करून त्याने एक मिथुन म्हणजे प्रकृतिपरुपाची एक जोडी निर्माण केली. सोऽकामयत द्वितीयो म आत्मा जायेतेति । स मिथुन समभवत् ।। (बृ. २-४) दुसरा एक माझ। आत्मा व्हावा म्हणून इच्छा केली व आपल्यांत दुसरे नसल्यामुळे तो स्वतःच प्रकृतिपुरुपाचे जोडपें बनला.पावसाळा आल्याबरोबर जसा बदल होतो त्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीचा काल येतांच एक तऱ्हेचा बदल भासू लागतो. परमात्म्याच्या ठिकाणी सृष्टिकार्याकरितां शक्तीची कल्पना येते. आणखी एक दुसरे माझें आत्मरूप व्हावे अशी कल्पना स्फुरते. अद्वितीय रूपाने असणाऱ्या परमा त्म्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली त्याच्या स्वरूपाची दुसरी भावनाच त्याची शक्ति, या शक्तीलाच प्रकृति म्हणतात. या प्रकृतीला ‘द्वितीया’ असेंहि एक नांव आहे. मूळरूप पूर्ववत् असून परमात्म्याच्या संकल्पाने दोन रूपें धारण झाली. हेच मिथुन, हीच प्रकृतिपुरुष होत. सृष्टिकरणाच्या आंदोलन-समयापासून ते स्पष्ट सृष्टीपर्यंत प्रत्येक झालेल्या सर्व कृतींतून या प्रकृतिपुरुषाचे स्थूलसूक्ष्मरूप नित्य असतेच.
आत्मैवेदमप्र आसीत् । पुरुषविधः । (बृ. १-४-१) स वै नैव रेमे । तस्मादेकाकी न रमते । स द्वितीयमैच्छत् । स हैतावानास यथा स्त्रीपुमा, सौ संपरिष्वक्तौ स इममेवात्मानं द्वेधाऽपातयत्ततः पतिश्च पत्नी चाभवतां तस्मादिदमर्धबृगलमिव स्व इति ह स्माह याज्ञवल्क्यस्तस्मा दयमाकाशः स्त्रिया पूयेत एव ता समभवत्ततो मनुष्या अजायन्त ॥ (बृ. १-४-१, ३) पुरुषाच्यासारख्या आकाराचा एक आत्मा या सृष्टीच्या पूर्वी होता. एकट्यालाच त्याला करमले नाहीं, एकटाच तो त्या वेळी रमू शकला नाहीं. या मूळपुरुषाच्या स्वभावाप्रमाणें आतांहि एकट्यालाच करमत नाहीं. एकटाच रमूं शकत नाहीं. रममाण होण्यास कांहीं दुसरे असावें अशी त्यानें इच्छा केली. अशी ही इच्छा झाल्याबरोबर आलिंगिलेल्या स्त्रीपुरुषांच्या एकवटलेल्या रूपाप्रमाणे तो झाला. नारी-अर्धभागाच्या या पुरुषानें या आप ल्यालाच पृथक् अशा दोन रूपांनी विभागले. नंतर ते दोन विभाग पतिपत्नींच्या रूपानें प्रगट झाले. मूळपुरुषाचें द्वितीयरूप प्रकृति असल्यामुळे तिला जसे ‘द्वितीया’ हें नांव आहे त्याप्रमाणेच इथेहि पत्नी ही पुरुषाचें द्वितीयरूप असल्या मुळे तिला ‘ द्वितीया’ हें नांव आलें. मूळ प्रकृतिपुरुषच पतिपत्नी झाले. जुळविलेल्या एका वेळूच्या दोन उभ्या अर्धभागांप्रमाणें आपलें स्वरूप आहे असें याज्ञवल्क्य मैत्रेयी नामक आपल्या पत्नीस म्हणाला. या कारणानें पुरु पाचा हा मोकळा वामभाग स्त्रीनेंच भरून निघतो. ब्रह्मदेवाच्यापासून प्रथम उत्पन्न झालेला मनु आपल्या पत्नीमुळे पुन्हां जन्मास आला, त्या वेळी हीं मनुष्ये झाली.
अव्यक्तान्महत् महतो अहंकारः । – अव्यक्तापासून महत्त्व, महत्त्वा पासून अहंकार ही तीन स्थित्यंतरें जगदुत्पत्तीच्या पूर्वील प्रकृतीचे सूक्ष्म, मध्यम आणि स्थूल भावांचे तीन प्रकार होत. अव्यक्त स्थितींतील जगत्संकल्पाची अव्यक्तता हेंच तेथील प्रकृतिरूप. महत्तत्त्वांतील जगत्संकल्पाची, व्यक्ताव्यक्ततेची उभयात्मकता हेच तेथील माध्यमिक प्रकृतिरूप. अहंकारांतील जगत्संकल्पाचे प्रत्यक्ष स्यूलरूप हेच तेथील प्रकृतीचें, जगदाकाराचें स्थूलरूप होय. बीज असेपर्यंत अव्यक्त अंकुराप्रमाणें महत्तत्त्व, त्या अंकुरापासून पुढें व्यक्त व निर निराळी होणारी दोन पानें हेच स्थूल प्रकृतिपुरुषांचे प्रथक् स्वरूप. यांच्या •पासून विस्तारलेलें यांचे द्वंद्वात्मक स्थूलरूपच हा विश्वप्रपंच. या अव्यक्त, महत्त्व आणि अहंकार यांच्या अभिमानी परमात्मस्वरूपाला ईश्वर, हिरण्यगर्भ आणि विराट अशी क्रमश: तीन नांवे आहेत. उपरिनिर्दिष्ट वृहदारण्यक, श्रुति पररूपाने पुरुषच एक चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या रूपाने झाला असे सांगते. याब्रह्मदेवा पासूनच मनु-शतरूपा यांचा जन्म झाला. यांच्यापुढे अखिल पतिपत्न्यात्मक जोडप्यांचे निर्माण व या पतिपत्नीच्या जोडप्यांपासून सदीय तद्रूपाची सृष्टी झाली. ब्रह्मदेवाला एकट्याला करमेनासे झाले. इथेहि एक याला करमत नाही. ब्रह्मदेवानें आपल्या दुसऱ्या रूपाची इच्छा केल्याप्रमाणे येथे सुद्ध पुरुष आपल्या दुसऱ्या रूपाची इच्छा करतो तीच स्त्री. विवाहापूर्वीची बासना पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न होते हेच एकवटलेले पुरुषांचे रूप वेळी दोन भाग होण्यापूर्वी दोन भागांची भावना निर्माण करणारे, एकाला एक चिकटून असणारे पृथक् करणाचें पूर्वरूप एक होते. प्रकृतिपुरुषांची दोन वेग वेगळी रूपे होण्यापूर्वी ते दोन्ही भाग एकमेकांना चिकटून असल्याप्रमाणे एकत्र असतात. पुरुषाचे व तसेच स्त्रीपुरुषांचे रूप स्थूलत्वानें पृथक् होण्या पूर्वी एका बासनेत ते सुक्ष्म रूपानें एकत्रित असते. एका वेळचे उभे दोन भाग करून ते अर्धे अर्धे जोडले म्हणजे जसा एक वेळू पूर्ण होतो त्याप्रमाणे पुरुषाचा प्रकृति अथवा स्त्री रूपाचा अर्धा भाग त्याच्याशी जोडला को गृहस्थाश्रमांत एक अखंड देह होतो. सतीपतीनी एकदेहन्यायाने वागावें म्हणून याचकरितां म्हणतात. प्रजाकाम असणाऱ्या पुरुषाचा वासनेच्या रूपाने असणारा अर्धभाग विध्युक्त विवाहांत धर्मपत्नीच्या रूपाने व्यक्त होतो. सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवानें पति-पत्नीचा संकल्प करून आपल्या देहाच्या दक्षिणवाम भागापासून स्त्रीपुरुषांना निर्माण केलें. निर्माण करण्याकरितां दुसरे कांही तेथे नसल्यामुळे त्यानेच ती दोन्ही रूपें धारण केली. त्याने स्वतःच आपल्या दक्षिणवाम भागांनी स्त्रीपुरुष रूपें धारण केली. हौंच मनु आणि शतरूपा होत. या पा-मनूच्या योगानेच मनुष्ये अथवा मानव झाले. मनुस्मृतीत पहिल्या अध्यायांतील बत्तिसाव्या श्लोकापासून या सृष्टिक्रमाचे वर्णन आले आहे. उदाहरणार्थ
द्विधा कृत्वात्मनो देहमर्धेन पुरुषोऽभवत् ।
अर्धेन नारी तस्यां स विराजमसृजत्प्रभुः ॥ ३२ ॥
स स्वयं । ते मा वित्तास्य सर्वस्य स्स्रष्टारं द्विजसत्तमाः ॥ ३३ ॥ (मनु. १)
या लोकांवरून मनु ब्रह्मदेवापासून जन्मास आल्याचे व त्याच्यापासून सृष्टि उत्पन्न झाल्याचे स्पष्टपणे कळून येते. हे ब्राह्मणानो, या सर्वाचा उत्पत्तिकतो मीच म्हणून समजा, असा मनूने आपला परिचय करून दिला आहे. मनोजाता मनुजाः । मनोर्भवा मानवाः । एवमेव यदिदं किं च मिथुनमापिपीलिकाभ्यस्तत् सर्वमसृजत ॥ (बृ. १-४-४) याप्रमाणे स जातीतील जोडप्यांची उत्पत्ति झाली. स्त्री-पुरुषांची युग्में उत्पन्न झाली.