Literature

चैत्र वद्य अष्टमी

हल्ली आपले देशवासी पाश्चात्यांचे अनुकरण करताना दिसतात. पण ह्या मंडळीमध्ये प्रामुख्याने पाश्चात्यांचे सर्व दुर्गुणच आढळून येतात. पाश्चात्यांत असलेली धर्मश्रध्दाहि ह्या मंडळीत आढळत नाही. कोणत्याहि कार्यास प्रारंभ करतांना देव, धर्म ह्याची प्रेरणा आपणामध्ये असणे आवश्यक आहे. कारण युध्दासारखा अत्यंत गंभीर प्रसंग असला तरी पाश्चात्य सैनिक आपला देव, धर्म, गुरू यांचे स्मरण करतो असे म्हणतात. पण आपण कोठे आहोत ? कोर्टात जातांना वकीललोक साक्षीपुराव्यासाठी व कागदपत्रातील संदर्भासाठी काय काय खोटे बोलावें लागेल, ह्याचाच विचार करतात. अशांना देवधर्माची आठवण कशी येणार ?

सत्य, संयम, सद् भाव, साधना, साक्षात्कार, सर्वसिध्दी व शेवटी मोक्ष अशी आपल्या धर्माची रहस्ये होत. सत्य म्हणजे जसें सांगितले असेल तसे वागणें, यथार्थवचन, यथार्थज्ञान ही सर्व सत्याचीच अंगे. मनोनिग्रहमूलक विचार व आचारनिग्रह ही संयमाची लक्षणे होत. सद् भावाने सद्गृहस्थ होऊन सुखवस्तू म्हणून जगणें शक्य असते. देव, धर्म, गुरू ह्यांचा उपदेश ह्यात भक्तिप्रधान असणें म्हणजेच सद् भाव. सद् भावप्रेरित साधनेने म्हणजेच योग, तप, ह्यांनी परमात्म्याच्या अनुग्रहासाठी पात्र होऊन सर्वसिध्दीही मिळतील मोक्षप्राप्तीसाठी ह्या सर्व गोष्टी क्रमाने आचरल्या पाहिजेत.

श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img