Literature

चैत्र वद्य एकादशी

तुम्ही सर्व आनंदमय आहांत. ह्या विश्वात सर्व ठिकाणी आनंद भरला असून त्याखेरीज दुसरें कांहींहि नाही.
सूर्यप्रकाश एकमेव एकटाच ठेवून बाकीचें सर्व जग बाजूला सारलें तर केवळ प्रकाशच उरणार ! तद्वत् केवळ
आनंदाच्याच इच्छेमधून बाकीचे सर्व जग पुसून टाकले तर तिथे केवळ आनंदाच शिल्लक राहिल. आपणा
प्रत्येकास आनंदप्राप्तीची इच्छा असतेच. हा आनंद हाच प्रत्येकाचे सत्यस्वरूप असल्यानें आपण सर्व मूलतः
सुखरूपच आहोंत. ह्या आनंदातूनच नितांत अशी अखंड शांति विलसू लागते. ती शांति, तो आनंद आपणाला कां
लाभत नाही ? ह्याचें कारण आपले अज्ञानच. ' अज्ञानेनावृत्तं ज्ञानम् | ' ज्ञानावर अज्ञानाचें आवरण आलें आहे. तें
अज्ञानरूपी आवरण दूर झालें की आनंदाची प्राप्ती स्वयंसिध्दच हाच स्वरूपाचा आनंद असून तो स्वयं प्रकाशित
आणि जाणीवरूप आहे. हा आनंद हेंच आपलें सत्यस्वरूप, अर्थात हें सर्व समजण्यासाठीं 'मी कोण ?' ह्याचा विचार
करणें अत्यंत आवश्यक आहे. ' मी म्हणजे मीच ' हेच त्याचें उत्तर.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img