Literature

चैत्र वद्य चतुर्दशी

जन्मांपासून व कर्मापासून चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. आपला धर्म वर्णाश्रम धर्मव्यवस्थेवरच आधाराला असून त्याचे
पालन करणें म्हणजेच वैदिक धर्म पालन करणें होय.
जीवनाची सार्थकता आत्मोध्दारात आहे व भारतीयांना ते सहज शक्य आहे. अखिल मानव समाजानेहि
आत्मोध्दार हेच आपले लक्ष्य ठेवले पाहीजें. ऐहिक जीवन कितीहि सुखकर वाटत असलें तरी तें खरी शांति देणारे

नाही. जितका व्याप तितका संताप. जितके बाह्य उद्योग जास्त तितकेंच दुःख जास्त. इंद्रियजन्य सुख हा केवळ
सुखाभासच. ज्याला खरे सुख म्हणतात तें वेगळेच आहे. त्याची ओळख जाणत्यालाच.
मरणकालीन अनुभवांतहि सुख, समाधान असत नाही. तसें जर पाहिले तर त्यावेळी पुत्र, मित्र, कलत्रांच्या
ओढीमुळे जास्त दुःख होत असतें. इकडे मृत्युची ओढ व तिकडे पुत्र-मित्रावरील प्रेमाची ओढ ह्यामुळें तो काळ
जास्तच दुःखमय होतो. इकडे जिवंत रहाण्याची ओढ तर तिकडे मृत्युच्या पंज्यातून निसटणें अशक्य. अशा ह्या
गोंधळातच आयुष्याचा शेवट होतो.
जन्मल्यापासून मरेपर्यंत सुखासाठीं झटून मरण अति दुःखपर्यवसायी झाल्यास मरणोत्तर सुख मिळेल याचा
भरवसा नाही. मनुष्य शंभर वर्षे जगतो असें धरून चालू. हे संपूर्ण आयुष्य सुखसमाधान प्रयत्नांत घालवूनहि सुख
मृगजळासारखे आभास निर्माण करीत असतें. कष्टच सुख असें समजून आयुष्य कंठणा-या मानवास कोणत्याही
जन्मीं सुख मिळणार नाहीं.
श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img