Literature

चैत्र वद्य दशमी

अधर्मचारणाने सर्वनाश व धर्मपालनानें सर्वसिध्दी मिळते असें आपल्या धर्मांचे सांगणे आहे. ‘ धर्म एव हतो हन्ति | ‘ आपण धर्माचा नाश केल्यास धर्महि आपला नाश करतो. राजकारणामुळे स्वातंत्र्य मिळवणारे प्रतिष्ठित पुढारी अतिवृष्टि, अनावृष्टि थांबवू शकतात काय ? रोगादिकाच्या साथी हटवूं शकतील काय ? निसर्गप्रकोप आणि भूतपिशाच्यादि गोष्टी अधर्मद्योतकच होत. धर्मनाशामुळे हे सर्व उद्ववते. जगधारणेसाठी धर्म हाच आधार आहे. धर्मपालनानेंच आपलें संरक्षण होऊ शकते. ‘ धर्मो रक्षति रक्षित: | ‘ परिपालित धर्म धर्मपालांचे रक्षण करतो. ‘ धर्माचरण करा ‘ असा परमात्म्याचा आदेश आहे. परमात्मा त्याच्या आज्ञा पालन करणा-यावर अनुग्रह करीत असतो. त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करून अधर्मप्रवृत्त झाल्यास अधोगती ठरलेलीच. त्याच्या आज्ञेनें वागल्यास निश्चित कल्याण होतें व इतरांचेहि त्यामुळें हित होते.

परमात्म्याची कृपा अपेक्षिणारे सर्व लोक आपापल्या धर्मावर संपूर्ण श्रध्दा बाळगणारे असले पाहिजेत. सत्य, सहनशीलता, दया, ब्रह्मचर्यल, देवभक्ति ही सत् धर्मसूत्रे होत. असत्य, असहनशीलता, क्रौर्य, स्वेच्छाविहार, नास्तिकता ही सर्व अधर्माची लक्षणे होत. ह्या अधर्ममार्गाचा त्याग करून सध्दर्म मार्गाचा अवलंब केल्यास भगवद्कृपाप्रसाद प्राप्त होऊन इहलोकी सुख व परलोकी मोक्ष मिळतो.

श्री प.पू सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img