Literature

चैत्र वद्य सप्तमी

आदि मनुपासून मानवकूल उत्पन्न झाले. त्याच मनुनें वैदिक धर्मामधील विधीनिषेधात्मक स्मृती म्हणजेच मनुस्मृति लिहीली व तिलाच आपण विश्वधर्मोत्पत्तींचें मूळ कारण म्हणूं शकतो. या विश्वधर्माच्या पालनानेंच मानव कुलाचा उद्धार होईल असा आपल्या पूर्वजांचा दृढ विश्वास होता.

आतां आधुनिकांनी ‘हिंदू लाॅ ‘ तयार केला आहे. ब्रिटिश विधर्मीय होते. तरीहि आपल्या धर्माचा नायनाट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. कारण आपल्या लोकांच्या मनाप्रमाणें वागण्याचा त्यांचा स्वभाव होता. परंतु आजचे आपले म्हणविणारे राज्यकर्ते पाश्चात्यांना अनुकूल असणा-या सुधारणा करून भारतीय मानवधर्माचा नाश करीत आहेत. ‘ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ‘ ह्या म्हणीप्रमाणे आपणच आपल्या संस्कृति व धर्माच्या नाशास कारणीभूत झाल्यास त्यास कोण काय करणार ? ‘ कालाय तस्मै नमः | ‘
पाश्चात्य लोक स्वतःच्या धर्मामध्ये संपूर्ण श्रध्दा बाळगतात. पण आमची मात्र आमच्या धर्मावर श्रद्धा नाही.

‘ आपल्या श्रुतीस्मृतींत असे सांगितलें आहे. आपल्या भाष्यकारांनी असें प्रतिपादिलें आहे. ‘ असें सांगितल्यास आमचा त्यावर विश्वास बसत नाही. पण तीच गोष्ट पाश्चात्यांनी सांगितल्यास मग मात्र ती विश्वासार्ह वाटते . पाश्चात्य वैदिक धर्मविचार कसें सांगतील ? ते मूर्ख आहे ? ते स्वाभिमानशून्य आहेत काय ?

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img