Literature

चैत्र शुक्ल चतुर्थी

श्रीरामायणाच्या पठणाने ऐश्वर्य व पुत्रलाभ होतो. सुग्रीवाला आणि बिभिषणाला श्रीरामांनी प्रकट ऐहिक ऐश्वर्य दिले. श्रीरामायणात निपुत्रिक दशरथाला पुत्रकामेष्ठीच्या योगाने झालेल्या पुत्ररत्नांचीच ही कथा आहे. तेव्हा त्याच्या श्रोत्यांना व पाठकांना पुत्रप्राप्ती होईल यात काही संशय नाही. श्रीरामायणाच्या श्रवणपठणानें अभ्युदय- नि: श्रेयसाची प्राप्ती होते. अभ्युदय म्हणजे ऐहिक वैभव. नि:श्रेयस म्हणजे मोक्ष. ह्या दोहोंची प्राप्ती ज्याच्या योगे होते त्या धर्माचेच त्या त्या प्रमाणे आचरण श्री रामायण सर्वांना सारखेच शिकवते. म्हणुन त्याच्या पठणानें ब्राम्हण वाणीवर प्रभुत्व मिळवून त्याला सकल व्याख्यानकौशल्य लाभेल. क्षत्रिय पृथ्वीचे अधिपत्य प्राप्त करील; वैय्य व्यापारात खूप संपत्ती मिळवील व शुद्र महत्वास प्राप्त करुन घेईल. आयुर्वर्धक अशा ह्या श्रीरामायणचे जो नुसते पठण करील तो ह्या पृथ्वी तलावर आयुष्य असेपर्यंत सुखाने नांदून परलोकी सहकुटुंब सहपरिवार पुत्रपौत्रासहवर्तमान स्वर्गीय देवतांच्या आदरास प्राप्त होऊन स्वर्गात सुखाने राहील. याहून अधिक काय पाहिजे? ‘ यो यदिच्छति तस्य तत् ‘ श्रीरामायणाच्या श्रवणपठणानें जो ज्याची इच्छा करील त्याला त्याची प्राप्ती होईल हेंच खरे !!

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img