Literature

चैत्र शुक्ल तृतीया

श्री. महादेवाने वाल्मीकीऋषींना ‘ श्रीरामायणाची मनोरम पुण्य कथा पद्यातून गा व मानवीजीवनाचा दिव्य मार्गदर्शक ग्रंथ निर्माण कर ‘ म्हणून आज्ञा देऊन ‘ मानवीजीवनाचा आदर्श पुढे ठेवणारा पुण्यवान ग्रंथ, जोपर्यंत नद्या वहात रहातील तो पर्यंत म्हणजे जगाच्या अगदी अंतापर्यंत आपल्या सत्त्वबलावर महत्त्वपूर्णतेने सतत प्रचारांत राहील ‘ असेही सांगितले. यावरून श्रीरामायणाचे चिरस्थायी महत्त्व सुव्यक्त होते. श्रीरामायणाचे महत्त्व श्रीसमर्थांनीही सुव्यक्त केले आहे. श्रीरामायणाची अपूर्वता पटवून देतांना श्रीसमर्थ म्हणतात.

‘ जेणे फेडिला पांग ब्रह्मदिकांचा ! बळे तोडिला बंध त्या त्रिदशांचा !! म्हणोनी कथा थोर या राघवाची ! जगीं ऐकता शांति होते भवाची !! कथा थोर रामायणी सार आहे ! दुजी उपमा या कथेला न साहे !!
( यु कांड )

‘ दुजी ऊपमा या कथेला न साहे !! ‘ कां ? तर ‘ कथा थोर रामायणी सार आहे ! ‘ हे त्याचे कारण आहे. ‘ सार ‘ व ‘ थोर ‘ आपला महत्त्वाचा संबंध दाखविणारे परस्पर पोषक असे हे दोन शब्द अधोरेखित करण्याइतके महत्त्वाचे आहेत. ‘ चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ‘ ‘ जनी ऐकता शांति होते भवाची ‘ म्हणजे सा-याच भवदु:खाची.

श्रीरामायण भक्तीने नुसते श्रवण केले तरी ब्रह्मस्थान प्राप्त होते व तो ब्रह्मदेवानाही पुज्य ठरतो हे ज्याचे फळ, त्या श्रीरामायणाची महती किती म्हणून वर्णावी ?

श्री प. प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img