Literature

चैत्र शुक्ल प्रतिपदा

‘ जयजयाची सद्गुरू पूर्णकामा | परमपुरूषा आत्मयारामा!
अनिर्वाच्य तुमचा महिमा | वर्णिला न वचे || जें वेदांसी सांकडे | जें शब्दासी कानडे |
जें सच्छिष्यासि रोकडे | अलभ्य लाभे ||
जें योगियांचे निजवर्म | जे शंकराचें निजधाम | जें विश्रांतीचे निजविश्राम | परमगृह्य अगाध ||
तें ब्रम्ह तुमचेंनि योगे | स्वये आपणचि होइजे अंगे ||
दुर्घट संसाराचेनि पांगे | पाविजेना सर्वथा ||

हे शब्द कानावर येतांच ‘मुनिर्न व्यामोहं भजति गुरूदीक्षाक्षततमा:’ या वचनाची आठवण होते. गुरूदीक्षेच्या प्रखर तेजाने ज्यांच्या ह्रदयस्थ अज्ञानमताचा नाश झाला तो मुनी कधीही व्यामोहास प्राप्त होत नाही, अशा अर्थाचे हे पूज्यपाद श्रीमत् शंकाराचार्यांचे सिध्दांतगर्भित अमरबोल श्रीसमर्थांच्या अचूक वाणीचायथायोग्य परिचय करून देतात.

‘ज्याचे रूप अरूप, नाम न घडे, ध्यानी मनी नातुडे |
ज्याचा पार अपार, वृत्ति पहातां स्वानंदडोहीं बुडे ||
तर्का भूलि पडे, समूळ विघडे, संसारमाया उडे |
तें हें नाम म्हणा ‘ श्रीराम ‘ म्हणतां दासासि प्रेमा चढे ||

ह्या श्लोकांत श्रीसमर्थांनी श्रीरामाच्या नांव – रूपाचा तात्विक परिचय करून दिला आहे. ‘ स्वानंद डोही बुडे ‘ हेंच आपणास पाहिजे व त्यासाठीच आपले सर्व प्रयत्न !!

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img