Literature

चैत्र शुद्ध त्रयोदशी

‘रा’ हा वर्ण पुरूषद्याेतक आणि ‘म’ हा वर्ण प्रकृतिद्याेतक असल्यामुळे पुरूषप्रकृत्यात्मक सगुण व ‘रा’ ‘म’ ह्या दाेन वर्णाचा जुळवून केलेला ‘ राम ‘ हाेत असल्यामुळे ह्या नामांत पुरूषप्रकृतीचे ऐक्यहि आहे, निर्गुण परमात्म्याचे ब्रह्मरूपहि आहे.

हे जग अग्निचंद्रात्मक आहे असे श्रुति म्हणते.’रा’ अग्नि व ‘म’ साेम. म्हणजे चंद्रवाचक असल्यामुळे ह्या दाेन रूपांनी असलेले म्हणजे पुरूषप्रकृत्यात्मक हे समस्त जगत् ‘ राम ‘ ह्या एका नामांत आहे. ‘र’ कार चतुर्मुख ब्रह्मवाचक अग्निरूप, ‘आ’ कार विष्णुवाचक आदित्यरूप आणि ‘म’ कार विष्णुवाचक आदित्यरूप आणि ‘म’ तार रूद्रवाचक साेमरूप ह्या तिन्हीचे ऐक्य ह्या ‘ राम ‘ शब्दांत हाेते आणि त्यामुळे ‘ राम ‘ हा शब्द ब्रह्मविष्णूशिवात्मक व अग्निसूर्यचंद्ररूप आहे. ह्या सर्वांचे ऐक्य, ह्याच्या दाेन्ही वर्ण जाेडून केलेल्या उच्चांरात हाेत असल्यामुळे ह्या तिघांचे लयस्थान व शुध्दरूप असणारे ब्रह्महि आहे.

‘रा’ प्राणवाचक व ‘म’ अपानवाचक.ह्या दाेन्ही प्राण अपानांचा लय ज्या ब्रह्मैक्यात हाेताे तें ब्रह्मैक्यरूप ‘ राम ‘ हे नाम आहे.
‘रा’ हे ब्रह्मरंध्रातील ब्रह्म व ‘म’ ही कुंडलिनी.कुंडलिनी ब्रह्मरंंध्रास पाेहाेचल्यानंतर याेग्यास जें ब्रह्मैक्याचे समाधिसुख लाभतें तद्वाचकहि हा ‘ राम ‘ शब्द आहे.
‘रा’ वाचक परब्रह्म व ‘म’ वाचक जीव. सुरूवातीचा ‘रा’ ईशवाच्यतत्पदार्थ आहे व ‘म’ जीववाच्य त्वं पदार्थ आहे. तत्वंपदाचे ब्रह्मैक्य असिपदानें साधले जातें तेच असिपदवाच्य ऐक्य ‘ राम ‘ अशा दाेन्ही वर्णाच्या जुळवून केलेल्या उच्चांरात म्हणजेच ‘ राम ‘ असें म्हणण्यात आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img