Literature

चैत्र शुद्ध षष्ठी

श्रीरामाच्या महत्वपूर्ण निखिल वैशिष्ठ्याचा, आदर्श जीवनाचा सर्वोत्कृष्ट ठसा आपल्या अंतःकरणावर उमटवून नितांत आदरणीय व सर्वथैव आदरणीय अशा सर्वोत्तम जीवन चरित्रत्याने आपले जीवन
‘सत्यं शिवं सुंदरम् ‘ करण्यास श्रीरामायणाशिवाय आपल्याला कोणता खरा आश्रय आहे? श्रीरामाच्या
ठिकाणी असलेल्या दया, क्षमा, शांती, मृदुता, प्रेम, उद्योगप्रियता, साहस, धैर्य, बळ, बुद्धि, पराक्रम, वीरत्व,निर्भयता, दूरदृष्टि, समयसूचकत्व,विनय, तितिक्षा, उपरति, संयम, निस्पृहता:नितीमत्ता, समत्व, त्याग, तेज, कर्तव्यदक्षता, मर्यादा-संरक्षण, एकपत्नीव्रत, स्तय, एकबाणी, एकवचनी, बाणेदारवृत्ती देव-धर्म ब्राम्हणभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ति , थोरमोठ्यांच्या ठिकाणांचा आदर , भ्रातुप्रेम, मित्रप्रेम, शरणागतवत्सला, सरलता, व्यवहारकुशलता, साधुरक्षण, दुष्टदमन, प्रजारंजन, अपिशुनता, पावित्र्य, वेदशास्त्रज्ञता, शील, धर्मज्ञता, धर्मपरायणता, लोकप्रियता, सर्वज्ञता, सर्वात्मकता, इत्यादि निखील आदर्श सद्गुणांचा बोध करून घ्यावयाचा झाल्यास श्रीरामशिवाय आपल्याला कोणता आदर्श आहे ?

‘ वाल्मीक ऋषी बोेललि नसता ! तरी आम्हासि कैचि रामकथा ! ‘ श्रीरामाच्या सर्वोत्तम जीवन – चारित्राची सत्कीर्ति श्रीरामायणाद्वारे प्रकट झाली म्हणून श्रीरामचरितसुधेचे आश्रयस्थान म्हणजे श्रीरामायण हे कोणास पटणार नाही ?

प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img