Literature

जाबाली

साधु राघव माभूत्ते बुद्धिरेवं निरर्थिका । 

प्राकृतस्य नरस्येव ह्यार्यबुद्धेर्मनस्विनः २

कः कस्य पुरुषो बन्धुः किमात्यं कस्य केनचित् ।

एक्रो हि जायते जन्तुरेक एव विनश्यति ॥३॥

तस्मान्माता पिता चेति राम सज्जेत यो नरः ।

उन्मत्त इव स ज्ञेयो नास्ति कश्चिद्धि कस्यचित् ||४||

यथा ग्रामान्तरं गच्छन्नरः कश्चिद्वहिर्वसेत् । 

उत्सृज्य च तमावासं प्रतिष्ठेतापरेऽहनि ||५|| 

एवमेव मनुष्याणां पिता माता गृहं वसु । 

आवासमात्रं काकुत्स्थ सज्जन्ते नात्र सज्जनाः ||६|| राजभोगाननुभवन्महाहन्पार्थिवात्मज

विहर त्वमयोध्यायां यथा शस्त्रविष्टपे ॥७॥( वा. रा. अयो. १०९) 

-हे साधु स्वभावाच्या रामा ! तुझी बुद्धि इतकी विशाल असून सर्व तुला समजत असूनहि एखाद्या प्राकृत माणसाप्रमाणें हें काय चालविलें आहेस ? तुझ्यासारख्याला हें कांहीं शोभत नाहीं. असे हे निरर्थक विचार स्वतंत्र बुद्धि नसणाऱ्या या भोळ्या भावड्यांना मात्र शोभतील. अशा या मातापित्यांच्या, देवाधर्माच्या भोळ्या भावना उगीच कां बाळगाव्यात ? यांत काय अर्थ आहे ? आपल्या देहापुरता मात्र आपण विचार करावा. इथे कोणी कुणाचा नाहीं. प्राणी एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो. कोण कुणाचा बंधु आणि कोण कुणाचा मित्र ? कोणापासून काय मिळवावयाचे आहे ? उगीच आई वडील म्हणून मूर्खाप्रमाणें या मोहांत जो निरर्थक पडतो, त्याला काय म्हणावे ? खरे सांगावयाचें म्हणजे कोणी कुणाचा नाहीं. कुठे बाहेर गांवीं जातांना एखाद्या धर्मशाळेत मुक्काम पडतो. तिथे असेपर्यंत तिथल्या ओळखीपाळखी, सहवास थोडा वेळ असतो. तिथून निघालें कीं कोणी कुणाचा नाही. कोणी इकडे तर कोणी तिकडे. चार दिशांकडे चार पांगतात. उरलेले तिथेच टाकून जातात. याचप्रमाणे कांहीं काळ एका कुटुंबांत आई-वडील, बंधु-बहीण, सती -पति, संतति-संपत्ति, घरदार, जमीनजुमला हा व्यवहार असतो. मार्गांतल्या एका ठिकाणच्या मुक्कामाप्रमाणे थोड्या वेळाच्या जीवनसौकर्याकरितां मात्र याचें प्रयोजन. म्हणून सज्जन यांत कधीं गुंतून पडत नाहीत. हे राजपुत्रा रामा सामान्य जनांना दुर्लभ अशा सकळ राजभोगांचा अनुभव घेत स्वर्गातल्या इंद्राप्रमाणे अयोध्येत यथेच्छ विहार करीत ऐस.

न ते कश्चिद्दशरथस्त्वं च तस्य न कञ्चन ।

अन्यो राजा त्वमन्यस्तु तस्मात्कुरु यदुच्यते ll १० ll

गतः स नृपतिस्तत्र गंतव्यं यत्र तेन वै ।

प्रवृत्तिरेषा भूतानां त्वं तु मिथ्या विहन्यसे ||१२|| 

अर्थधर्मपरा ये ये तांस्ता शोचामि नेतरान् । 

ते हि दुःखमिह प्राप्य विनाशं प्रेत्य भेजिरे ॥१३॥ 

अष्टाप्तपितृदैवत्यमित्ययं प्रसृतो जनः ।

अन्नस्योपद्रवं पश्य मृतो हि किमशिष्यति ॥१४॥ 

यदि भुक्तमिहान्येन देहमन्यस्य गच्छति ।

दद्यात्मवसतः श्राद्धं न तत्पथ्यशनं भवेत् ||१५|| 

दानसंचनना होते ग्रंथा मेधाविभिः कृताः ।

यजस्व देहि दीक्षस्व तपस्तप्यस्व संत्यज ॥१६॥

स नास्ति परमित्येतत्कुरु बुद्धिं महामते । 

प्रत्यक्षं यत्तदातिष्ठ परोक्षं पृष्ठतः कुरु ॥ १७॥( वा. रा. अयो. १०९)

रामा आतां तुझा दशरथाशी काही संबंध नाही आणि दशरथाचा तुझ्याशीं कांहीं संबंध नाहीं. राजा वेगळा तूं वेगळा जेथें जावयाला पाहिजे होतें तेथें तो राजा गेला. त्याचे काम आटोपलें. उत्पन्न झालेल्या सर्व प्राणि वर्गाचीच ही अंतिम गति. उगीच तूं कां हाडाची काडे करून घेत आहेस  वाटेल तसा रेलचेल पैसा मिळवून सुखानें राहावयाचे सोडून न्यायाने पैसा मिळवून धर्मानें वागावें देवाकरितां झिजावे म्हणून उगीच कष्ट सोसणाराला पाहून मनाला फार वाईट वाटतें. कुठला देव नि कुठला धर्म ! असेतोपर्यंत दुःखच भोगून बिचारे व्यर्थ मरून जातात. असेतोपर्यंत सुख नाहीं व मेल्यावर तर तें नाहींच नाहीं. मेल्यावर काय उरणार आहे  इथलेहि सुख नाही व तोहि नाश पावतो प्रत्यक्ष जळून राख झालेली बघून देखील पुन्हां त्याची आशा धरतात. त्याला पितृदैवत म्हणून मानतात. त्याचे श्राद्ध करतात. उगीच अन्न वायां घालवितात. जेवावयाला तो असला पाहिजे का नाहीं ! मेलेल्याचे काय उरतें गाडगें फुटलें तें फुटूनच गेलें कोणाला तरी जेवावयाला घातल्यानें कोणाचें तरी पोट भरावयाचे झाल्यास दुसऱ्या गांवीं गेलेल्याचें श्राद्ध करून इथे ब्राह्मणाला ज्ञेवावयाला घातलें म्हणजे झालें तिथें त्याचें पोट भरेल ! असें कुठें होतें का  दानधर्मपर असे हे ग्रंथ आपली पोळी पिकावी म्हणून बुद्धिमानांनीं केले आहेत. स्वार्याकरितां अशी मंडळी  यज्ञ कर दान दे दीक्षा घे तप कर संन्यास घे म्हणून सांगत सुटतात. दुसऱ्याचे जावो आणि आपल्याला येवो हें यांचे धोरण असते. तेव्हां यांत कांही अर्थ नाही म्हणून तूं निश्चित समज. प्रत्यक्षाकडे तोंड करून अप्रत्यक्षाकडे पाठ फिरव. जाबालीचा नास्तिकवाद आपण थोडक्यांत ऐकला. श्रीरामाचे यावरचे उत्तर आतां बघू.

home-last-sec-img