Literature

ज्येष्ठ वद्य तृतीया

सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांचा संपर्क , अनुकरण यामुळे बाकीचे लोकही त्यांच्यासारखे वागु लागून संपूर्ण एकंदर समाजाचे रूपच विकृत झाले आहे. हा कोणत्या वर्णाचा आहे हे त्याच्या वेशभुषेवरून कळणे कठीण झाले आहे. तसेंच आहार-विहारातही बिघाड झाला आहे.

पश्चिमात्यांना स्नान-संध्यादिंचे बंधन नसते. बिस्कीटासह. चहा पिणे हेंच त्यांचे प्रातःस्मरण व हीच त्यांची स्नान,संध्या,
उपासना होय. त्यांना उपनयनादि संस्कार नाहीत. विवाह म्हणजे ‘काॅनट्रॅक्ट’ व तो रजिस्टर झालाच पाहिजे. घटस्फोटासाठीसुद्धा त्यांची केव्हाही तयारी असते. त्यामुळे त्यांचे जीवन निर्जीव यंत्राप्रमाणे झाले आहे. आपले लोकही त्यांचेच अनुकरण करीत असून आपले शासनही त्यालाच पुष्टी देते. पुढे काय होणार आहे ते परमेश्वर जाणो!! एकंदरीत आपला सनातन धर्म आपल्या समाजजीवनात सत्य, सदाचार इत्यादी उत्पन्न करून उच्च जीवन जगण्यासाठी आपल्याला उद्युक्त करीनासा झाला आहे. दिव्य जीवन देणाऱ्या सनातन धर्माची होत असलेली ही अवनती म्हणजेच समाजाचीही अवनती होय.

बाह्यजीवन नष्ट झाल्याचे परिणामस्वरूप आंतरिक ज्ञानपिपासा सुध्दा नष्ट झाली आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? याचा वाराही या लोकांच्या जवळून वाहात नाही. सदाचार प्रवृत्ती नष्ट झाली आहे. समाज उच्छृंखल होऊन मन मानेल तसा वाहत, भरकटत चालला आहे. लोकांमध्ये विषयाभिमान वाढून विषयलोलूपतेसच सर्वत्र प्राधान्य मिळालेले दिसत आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img